

3 shinde Shivsena candidates won unopposed in KDMC
ESakal
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा खालोखाल शिवसेना शिंदे गट यांनी अखेर आपले खाते उघडत पहिल्याच टप्प्यात ताकद दाखवून दिली आहे. प्रभाग क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे आणि वृषाली जोशी हे शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, या प्रभागात महायुतीचा राजकीय वरचष्मा स्पष्टपणे दिसून आला आहे. याच प्रभागातून भाजपच्या ज्योती पाटील यांचाही विजय निश्चित झाल्याने, महायुतीने या प्रभागावर संपूर्ण पकड मिळवली आहे.