Shivsena : शिंदेही नाही अन् ठाकरेही; दसरा मेळावाच रद्द होणार? निर्णय न्यायालय घेणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dasara Melava 2022
Shivsena : शिंदेही नाही अन् ठाकरेही; दसरा मेळावाच रद्द होणार? निर्णय न्यायालय घेणार

Shivsena : शिंदेही नाही अन् ठाकरेही; दसरा मेळावाच रद्द होणार? निर्णय न्यायालय घेणार

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा मुद्दा आता चांगलाच पेट घेताना दिसत आहे. शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडानंतर आता दसरा मेळावा शिंदे गट घेणार की ठाकरे घेणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. अशातच आता शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी थेट कोर्टात धाव घेतली आहे.

हेही वाचा: Dasara Melava Shivsena: ठरलं? शिंदे गटाचा अर्ज BMC ने स्विकारला तर शिवसेनेचा फेटाळला!

शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात दसरा मेळाव्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क मैदानासाठी चढाओढ सुरू आहे. मात्र अद्याप मुंबई महापालिकेने या मैदानाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. हे मैदान आपल्यालाच मिळावं, या मागणीसाठी आता शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता या वादाचा निर्णय़ही न्यायालयात होणार, असं दिसतंय. मात्र या मुळे आता दसरा मेळावा होणार की नाही, यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हेही वाचा: Shivsena : इकडे ठाकरे दसरा मेळाव्यासाठी न्यायालयात; तिकडे शिंदे गट राज्य पिंजून काढणार

या प्रकरणी २७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. ५ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. आता तोवर न्यायालयाने निर्णय दिला तर ठीक. मात्र जर न्यायालयाचा निर्णय आला नाही, किंवा पुढची तारीख देण्यात आली. तर मात्र दसरा मेळावा रद्द होण्याचीही शक्यता आहे. आता शिवाजी पार्क न मिळाल्यास आपण टॅक्सीवर उभं राहून, रस्त्यातच भाषण घेऊ अशी तयारीही ठाकरेंच्या शिवसेनेकडून दाखवण्यात आली आहे. त्यामुळे आता लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे आहे.

हेही वाचा: Shivsena : 'थेट मैदानात उतरून दसरा मेळावा घेऊ'; शिवसेना आक्रमक, प्रकरण कोर्टात जाणार?

इकडे शिंदे गटाने प्लॅन बी म्हणून बीकेसीतल्या मैदानासाठीही प्रयत्न केले आहेत. शिवसेनेनेही या मैदानासाठी अर्ज केला होता. मात्र ठाकरेंचा अर्ज फेटाळला गेला असून शिंदेंचा अर्ज स्विकारण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे पोस्टर्सही प्रदर्शित करण्यात आले आहेत. या पोस्टर्समध्ये दसरा मेळाव्याची वेळ, तारीख दिली आहे आणि ठिकाण दिलं आहे "शिवाजी पार्क, दादर."

Web Title: Shiv Sena Uddhav Thackrey Bombay High Court Dasara Melava Mumbai Dadar Bmc

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..