'डोक्‍यात हवा जाऊ देऊ नका '

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

मुंबई - महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने दिलेल्या काही उमेदवारांमुळे पक्षातील इच्छुकच नव्हे; तर अनेक कार्यकर्तेही नाराज झाले आहेत. कार्यकर्त्यांच्या नाराजीचा निवडणूक निकालावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आता गोंजरले जात आहे; तर उमेदवारांनी हवेत जाऊन कार्यकर्त्यांचा अपमान करू नये, असा सल्ला प्रत्येक विभागप्रमुख देत आहेत. 

शिवसेनेच्या प्रत्येक शाखेतून तीन इच्छुकांची यादी मातोश्रीवर पाठवण्यात आली होती. परंतु काही प्रभागात अनपेक्षितपणे काही कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. त्याचा परिणाम दिसत आहे. इच्छुकांबरोबरच कार्यकर्तेही नाराज झाले आहेत. या नाराजीचा फटका बसू नये म्हणून शिवसेनेने कार्यकर्ते आणि प्रभागातील पदाधिकाऱ्यांना गोंजारण्यास सुरुवात केली आहे. या कार्यकर्त्यांच्या बैठकीत उमेदवारांनाच डोस पाजले जात आहेत. उमेदवारी मिळाली म्हणून डोक्‍यात हवा जाऊ देऊ नका.

कार्यकर्त्यांमुळेच तुम्ही निवडून येणार आहात, त्यांना नाराज करून निवडणूक जिंकता येणार नाही. त्यामुळे त्यांना दुखावू नका, असा सल्ला उमेदवारांना विभाग प्रमुखांमार्फत दिला जात आहे. 

ज्येष्ठ कार्यकर्त्यांची आठवण 
प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांची नवी फौज आल्यानंतर ज्येष्ठ कार्यकर्ते मागे पडतात; पण निवडणुकीच्या काळात या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनाही सुगीचे दिवस आले आहेत. अनेक उमेदवार प्रभागातील जून्या-जाणत्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. ज्येष्ठ कार्यकर्ते प्रचारासाठी बाहेर पडल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मत आहे. 

Web Title: shiv sena upset Activists