esakal | बाबरी मशीद निकालाचे शिवसेनेकडून स्वागत; आडवाणी, उमा भारती, जोशींचे केले अभिनंदन
sakal

बोलून बातमी शोधा

बाबरी मशीद निकालाचे शिवसेनेकडून स्वागत; आडवाणी, उमा भारती, जोशींचे केले अभिनंदन

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, शिवसेना नेते संजय राऊतांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

बाबरी मशीद निकालाचे शिवसेनेकडून स्वागत; आडवाणी, उमा भारती, जोशींचे केले अभिनंदन

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाच निकाल आज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला. गेल्या 8 वर्षापासून हा खटला सुरू होता. या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, शिवसेना नेते संजय राऊतांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

गेल्या 8 वर्षांपासून सुरू असलेला बाबरी मशीद विध्वंस खटल्याचा आज निकाल लागला. हा ऐतिहासिक निकाल असल्याचे खटल्याशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबध असणाऱ्यांनी म्हटले आहे. या खटल्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. मशीद पाडण्याचा कट पूर्वनियोजित नव्हता. ही घटना अचानक घडली असल्याचं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. आरोप सिद्ध करण्याइतपत कोणताही ठोस पुरावा नसल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केले आहे.

मुंबईतील वन्यजीवसृष्टीचे वैभव एका क्लिकवर! मुंबईचा जैवविविधता नकाशा तयार

.लालकृष्ण आडवाणी, उमा भारती सह इतर सर्वांची निर्दोष सूटका करण्यात आली आहे. आता झालेल्या गोष्टी विसरायला हव्यात. बाबरीचा ढाचा पाडला नसता तर राममंदीर बनलंच नसतं. आम्हालाही हाच निर्णय अपेक्षित होता. ज्या दिवशी पंतप्रधान मोदींनी अयोध्येत जाऊन भूमीपूजन केलं तेव्हाच बाबरीचा खटला संपला आहे. आता न्यायालयाला आणि खटल्याला काहीच महत्त्व राहत नाही. बाबरी पाडली म्हणून राम मंदिर उभं राहिलंअसं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच शिवसेनेच्या वतीने लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे.

1992 साली बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्याप्रकरणी लखनऊच्या विशेष सीबीआयच्या न्यायालयात आरोपींविरोधात खटला दाखल झाला होता. गेली आठ वर्षे हा खटला सुरू होता. परंतु ठोस पुराव्याअभावी आरोपींची मुक्तता करण्यात आली आहे