व्यापाऱ्यांच्या अडचणींना शिवसेना आधी धावून येईल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

तुर्भे - व्यापाऱ्यांच्या कोणत्याही अडीअडचणी असल्यास शिवसेना आधी धावून येईल. त्यासाठी नाते घट्ट करून ठेवल्यास महाराष्ट्र अधिक सुदृढ होईल, अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाशीतील एका कार्यक्रमात दिली . 

वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मसाला मार्केटमध्ये सोमवारी शिवशक्ती इम्पेक्‍सचे उद्‌घाटन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते म्हणाले की हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मार्केट वाचविण्यासाठी नेहमीच प्रयत्न करीत. व्यापारी वर्गाला त्यांनी कायम पाठिंबा दिला होता. त्यामुळे येथील घटकांशी असलेली आपुलकीही कायम असेल. आजच्या उद्‌घाटनाला बोलावले त्याचा अभिमान वाटतो. जसे आज येथे बोलावले, तसे दिल्लीतही बोलवा, असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले. या वेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार संजय राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार राजन विचारे, आमदार नरेंद्र पाटील, शिवसेना उपनेते विजय नाहटा, विरोधी पक्षनेते विजय चौगुले आदी उपस्थित होते. 

Web Title: Shiv Sena will come forward before the problems of traders