Video : 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन'; फडणवीसांसमोर घोषणाबाजी

Shiv Sena workers raised slogans when BJP leader Devendra Fadnavis was leaving from Shivaji Park
Shiv Sena workers raised slogans when BJP leader Devendra Fadnavis was leaving from Shivaji Park

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आज, सकाळी शिवसेनेला 'स्वाभिमान'चा सल्ला देणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, मुंबईत शिवसैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. फडणवीस यांच्यासमोरच मी पुन्ही येईन, मी पुन्हा येईन अशा घोषणा देण्यात आला. तर, यावेळी बाळासाहेब हे भाजप शिवसेना परिवाराचे कुटुंबप्रमुख होते, अशा शब्दात माजी मंत्री विनोद तावडे यांनी श्रध्दांजली अर्पण केली आहे.

अन् फडणवीस निघून गेले
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आज, फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केले. यावेळी भाजपचे अन्य नेतेही त्यांच्यासोबत उपस्थित होते. माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यासह मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढादेखील उपस्थित होते. बाळासाहेबांना अभिवादन करताना, त्या परिसरात उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर फडणवीस शिवतीर्थावरून बाहेर पडले. ते गाडीत बसत असताना, तेथे उपस्थित शिवसैनिकांनी 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळीही अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा अशा घोषणा देण्यात येत होत्या. सत्ता कुणाची शिवसेनेची, अशा घोषणा परिसरातील कार्यकर्ते देत होते. त्यानंतर फडणवीस तातडीने गाडीत बसून तेथून निघून गेले. निवडणुकीपूर्वी भाजप कार्यकर्ते मी पुन्हा येईनच्या घोषणा देत होते.

शिवसेनेचे प्रत्युत्तर

ट्विटरवर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना, आज सकाळी फडणवीस यांनी स्वाभिमानाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल,' याचा राऊत यांनी पुनरुच्चार केला असून, आम्हाला कोणी स्वाभिमान शिकवण्याची गरज नाही, असे उत्तरही शिवसेनेकडून फडणवीस यांना देण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com