
मुंबई : मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात टोकाचे मतभेद झाल्यानंतर आज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने भाजप नेते शिवतीर्थावर येणार का?, असा प्रश्न सकाळपासून उपस्थित केला जात होता. त्याला भाजप नेत्यांनीच पूर्णविराम दिलाय.
मुंबई : मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात टोकाचे मतभेद झाल्यानंतर आज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने भाजप नेते शिवतीर्थावर येणार का?, असा प्रश्न सकाळपासून उपस्थित केला जात होता. त्याला भाजप नेत्यांनीच पूर्णविराम दिलाय.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
बाळासाहेबांना अभिवादन करताना, फडणवीस म्हणतात 'स्वाभिमान जपा'
मुंडे, तावडेंनी केले अभिवादन
सकाळपासून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवतीर्थावर येऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केल्यानंतर, दुपारी एकच्या सुमारास भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे, तसेच माजी मंत्री विनोद तावडे एकत्र शिवतीर्थावर दाखल झाले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादनही केले. पाठोपाठ आमदार भाई गिरकर आणि सुनील राणे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.
भाजपला घालवण्यासाठी आघाडीसोबत; राजू शेट्टींनी भूमिका केली स्पष्ट
मराठी अस्मितेचा हुंकार म्हणजे बाळासाहेब ठाकरे : शरद पवार
अरे आवाज कुणाचा?
पंकजा मुंडे आणि विनोद तावडे तेथेच काही काळ थांबले. या वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील तेथे दाखल होणार असल्याची चर्चा सुरू झाली. दुपारी दीडच्या सुमारास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर दाखल झाले. या वेळी भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी फडणवीस यांचे स्वागत केले. फडणवीस शिवतीर्थावर आले. त्या वेळी नार्वेकर वगळता एकही शिवसेना नेता उपस्थित नव्हता. फडणवीस आदरांजली वाहत असताना उपस्थितांमधून अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा, अशी घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, माजी मंत्री आणि लोकसभा सदस्य अरविंद सावंत, आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांनी स्मृतीस्थळावर पुष्प अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.