विश्वनाथ महाडेश्वर शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

संख्याबळ
- शिवसेना अपक्षांसह- 88
- भाजप, अभासे आणि एक अपक्षासह- 84
- कॉंग्रेस- 31
- राष्ट्रवादी कॉंग्रेस- 9
- मनसे- 7
- सप- 6
- एमआयएम- 2

मुंबई - मुंबईत महापौरपदासाठी आज (शनिवार) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना शिवसेनेने महापौरपदासाठी विश्वनाथ महाडेश्वर यांचे नाव निश्चित केले आहे. समाजवादी पक्षानेही महापौरपदाच्या शर्यतीत आपला उमेदवार उतरविला आहे.

मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. युतीबाबत प्रश्‍नचिन्ह असतानाच शिवसेना आणि भाजपने महापौर आणि उपमहापौरपदाचे अर्ज घेतले आहेत. काँग्रेसनेही महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्याची तयारी केली आहे; परंतु भाजपनेही अर्ज भरल्यास मनसेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. शिवसेनेने आपला उमेदवार निश्चित केला आहे. मात्र, भाजपने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. 

मुंबईच्या महापौरपदासाठी 8 मार्चला निवडणूक होत आहे. शिवसेनेने 84 नगरसेवकांसह चार अपक्षांचा पाठिंबा मिळवत 88 सदस्यांची कुमक जमा केली आहे, तर एका अपक्ष नगरसेविकेने भाजपला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेस अशा तिन्ही पक्षांनी अर्ज भरल्यास महापौरपदासाठी पहिल्यांदाच तिरंगी लढत होईल. 

संख्याबळ
- शिवसेना अपक्षांसह- 88
- भाजप, अभासे आणि एक अपक्षासह- 84
- कॉंग्रेस- 31
- राष्ट्रवादी कॉंग्रेस- 9
- मनसे- 7
- सप- 6
- एमआयएम- 2

Web Title: Shiv Senas corporater Vishwanath Mahadeshwar candidate for mayor post in Mumbai