esakal | मुरबाडमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी बांधले शिवबंधन
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुरबाडमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी बांधले शिवबंधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुरबाड : मुरबाड (Murbad) तालुक्यात ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार शांताराम मोरे, ठाणे जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रकाश पाटील, ठाणे (Thane) जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार (Subhash Pawar) यांच्या उपस्थितीत रविवारी शिवबंधन बांधले. सरळगाव येथे तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा सत्कार करण्यासाठी कार्यक्रम घेण्‍यात आला. शिवसेनेचे (Shivsena) तालुकाप्रमुख कांतिलाल कंठे यांच्या पुढाकाराने सरळगाव येथे झालेल्या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या वेळी धसई जिल्हा परिषद गटातून खरेदी-विक्री संघांचे संचालक संतोष देसले, रमेश भोंडिवले, दुधनोली आदिवासी संस्थेचे चेअरमन नंदकुमार दामसे, राजेश देशमुख व इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

हेही वाचा: राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

या कार्यक्रमास आमदार शांताराम मोरे, शिवसेना संघटक अप्पा घुडे, महिला आघाडीच्या योगीता शिर्के, रामभाऊ दुधाळे, जिल्हा परिषदेचे सदस्य किसन गिरा, रेखाताई कंटे, पंचायत समितीचे सदस्य अनिलभाऊ देसले, रामभाऊ दळवी, मोहन भावार्थे, बाळू पष्टे आदी उपस्थित होते.

loading image
go to top