शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळांची मुंबई हायकोर्टात धाव | Mumbai high court | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anandrao adsul

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळांची मुंबई हायकोर्टात धाव

मुंबई : सिटी सहकारी बँक (City cooperative bank Fraud) गैरव्यवहारात अडचणीत आलेले शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) याचिका (petition) दाखल केली आहे. विशेष न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी नकार दिला आहे. त्यामुळे त्यांनी आज उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

हेही वाचा: ST कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ करारावर निर्णय ?मंत्र्यांच्या बैठकीत खलबतं

न्यायालयाने याचिकेची दखल घेतली असून पुढील सुनावणी ता. 29 रोजी निश्चित केली आहे. बँकेचे अध्यक्ष असताना सुमारे 900 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.

यावर ईडीने तपास सुरू केला असून अडसूळ यांना समन्स बजावले आहे. यापूर्वी देखील अडसूळ यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र त्यावेळी त्यांना दिलासा मिळाला नव्हता.

loading image
go to top