इथे जग कोरोना महामारीच्या दहशतीखाली आणि ठाण्यात शिवसेना भाजपची निधीवरून भांडणं

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 मे 2020

ठाणे शहरात एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना शिवसेना-भाजपमध्ये रुग्णालयावरून कलगीतुरा रंगल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

ठाणे : कोरोना रुग्णांसाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे एक हजार खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या रुग्णालयाला नगरसेवक निधी देण्यास भाजपने विरोध केल्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी भाजपला राजकारण न करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपने शिवसेनेवर टीकास्त्र सोडत कम्युनिटी किचन आणि आरोग्य साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. ठाणे शहरात एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना शिवसेना-भाजपमध्ये रुग्णालयावरून कलगीतुरा रंगल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

शेवटी धीर खचला आणि कोरोना रुग्णाने उचललं नको ते पाऊल, मनाला चटका लावून जाणारी बातमी

भाजपचे पालिकेतील गटनेते संजय वाघुले यांनी आरोग्य विभाग आणि कम्युनिटी किचनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. तसेच या हाॅस्पिटलसाठी 'आपला दवाखाना'ला ठेवण्यात आलेला निधी वापरावा असे मत भाजपच्या नगरसेवकांनी व्यक्त केले आहे. त्यावरून महापौर नरेश म्हस्के यांनी भाजपच्या नगरसेवकांवर टीका करून हा विरोध केवळ राजकीय असल्याचा आरोप केला आहे. मात्र महापौरांनी केलेले आरोप भाजपने फोटाळून लावले आहेत. 

नगरसेवक निधीऐवजी रुग्णालयासाठी आपला दवाखानाचा निधी पडून आहे तो द्यावा. नगरसेवक निधीऐवजी रुग्णालयासाठी आपला दवाखानाचा निधी पडून आहे, तो देण्यात यावा. हा निधी देऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांचे हात दगडाखाली अडकले आहेत का? कोणाला कमिटमेंट केली आहे का? - संजय वाघुले

चहल ऍक्शनमध्ये पण कोरोनाला रोखण्याचे नवे आयुक्त चहल यांच्यापुढे मोठे आव्हान

सध्या जी काही कोरोनाची परिस्थिती ओढावली आहे, त्यात पालिकेच्या उत्पन्नावर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे नगरसेवक निधीही रुग्णालयासाठी दिला तर भविष्यात निधीबाबत अडचणी निर्माण होतील असे वाघुले यांनी सांगितले. त्यामुळे राजकारण भाजप नाही तर शिवसेना करीत असून शहरात जो आरोग्य साहित्य खरेदीचा आणि कम्युनिटी किचनचा घोळ उघडकीस आला आहे, त्याची आधी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी वाघुले यांनी केली आहे. 

विशेष म्हणजे भाजपाच्या काही नगरसेवकानी या रुग्णालयाला पाठींबा दिला आहे. पण हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असून पक्षाचे नगरसेवक गटनेते घेतील त्याच निर्णयाला बांधील राहणार असल्याचे वाघुले यांनी स्पष्ट केले आहे.

shivsena and bjp fights over donating corporator contribution for covid hospital


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena and bjp fights over donating corporator contribution for covid hospital