भाजप नेत्यांवर शिवसेना रुसली

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 24 जून 2019

विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिवसेना- भाजप युतीत मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य उमेदवारावरून मतभेद होऊ लागले आहेत, युतीमध्ये मोठ्या भावाचा मान कोणाला मिळणार, याचा निर्णय पक्षपातळीवर घेतला जाणार असून, युतीबाबत बेलगाम वक्तव्य करणाऱ्यांची तक्रार थेट भाजपच्या हायकमांडकडे करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिवसेना- भाजप युतीत मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य उमेदवारावरून मतभेद होऊ लागले आहेत, युतीमध्ये मोठ्या भावाचा मान कोणाला मिळणार, याचा निर्णय पक्षपातळीवर घेतला जाणार असून, युतीबाबत बेलगाम वक्तव्य करणाऱ्यांची तक्रार थेट भाजपच्या हायकमांडकडे करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे युती धर्मात काडी टाकणाऱ्यांविषयी तक्रार करणार आहेत. त्याचबरोबर समसमान पातळीवरील युतीचीही ते आठवण करून देतील. लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना- भाजप युतीमध्ये ‘मोठा भाऊ’ कोण यावरून धुसफुस वाढली आहे. भाजपचे नेते अमित शहांनी विधानसभा निवडणुकीतही युती कायम ठेवताना शिवसेना- भाजप समसमान जागांवर निवडणूक लढवणार असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानंतरही जलसंपदामंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन यांनी अलीकडेच लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच मोठा भाऊ असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे वक्तव्य करून मुख्यमंत्रिपद भाजपकडे राहणार असल्याचे सूतोवाच केले होते. महाजन यांचे हे वक्तव्य शिवसेनेने गंभीरपणे घेतले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Angry on BJP Leader Politics