Bacchu Kadu: "दुश्मन का दुश्मन दोस्त होता है"; खोके प्रकरणी अनिल परब यांच्या बच्चू कडूंना शुभेच्छा

खोके प्रकरणावरुन रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद सध्या चांगलाच रंगला आहे.
Anil Parab_Bacchu Kadu
Anil Parab_Bacchu Kadu

मुंबई : शिवसेनेत बंड करुन बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेंसोबत अपक्ष आमदार बच्चू कडू देखील गेले. त्यावेळी शिंदेंसोबत असलेल्या आमदारांवर रोख रक्कमेचे खोके घेतल्याचा आरोप झाला होता. यावरुन आता आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी दुश्मन का दुश्मन दोस्त होता है, असं विधान करत त्यांना या लढाईसाठी शुभेच्छाही दिल्या. (ShivSena Anil Parab wishes good luck to Bachu Kadu for Navneet Rana Controversy)

Anil Parab_Bacchu Kadu
‘Job for Sex’ Case: माजी मुख्य सचिवांच्या घरात सेक्सकांड? SITच्या तपासात धक्कादायक खुलासा

"बच्चू कडूंना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. ही लढाई तुम्ही जोरात लढावी, ही त्यांच्या स्वाभिमानाची लढाई आहे. ते जर म्हणताहेत की त्यांना ५० खोके मिळालेले नाहीत तर किती मिळालेत आणि किती राहिलेत याचा देखील त्यांनी हिशोब द्यावा. आमच्या संपर्कात कोणीही नाही किंवा आम्ही कोणाशी संपर्क केलेला नाही. कदाचित कोर्टात साक्ष तपासतील तेव्हा याबाबत सर्व तपशील बाहेर येईल, दुश्मन का दुश्मन दोस्त होता है" अशा शब्दांत अनिल परब यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूक आयोगानं कळवलेलं नाही - परब

आमची प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आल्याचं आम्हाला निवडणूक आयोगानं कळवलेलं नाही. कारण निवडणूक आयोगाला सुट्टी आहे, सुट्टीच्या दिवशी कोणी काम करत नाही. त्यामुळं आमची दोन लाख प्रतिज्ञापत्र रद्द झाल्याच्या बातम्या या पेरलेल्या बातम्या आहेत. याबाबत आमच्याकडं कुठलाही खुलासा निवडणूक आयोगाकडं अद्याप केलेला नाही, असंही परब यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरेंवर बाळासाहेबांचे संस्कार

आदित्य ठाकरेंवर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. त्यामुळं जे त्यांच्या संस्कारांबाबत बोलत आहेत त्यांनी सांगाव की त्यांच्यावरचे संस्कार चुकीचे आहेत. बाळासाहेबांचे संस्कार चुकीचे आहेत असं त्यांना म्हणायचं असेल तर त्यांनी तसं म्हणावं, असंही यावेळी परब म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com