esakal | वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, प्रसाद लाड यांचं स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, प्रसाद लाड यांचं स्पष्टीकरण

वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, प्रसाद लाड यांचं स्पष्टीकरण

sakal_logo
By
नामदेव कुंभार

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वाकयुद्ध सुरु झाले आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या. वाद शिगेला गेल्यानंतर अन् टीकास्त्र होत असल्याचं पाहून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं म्हटलं आहे. आम्ही माहीममध्ये आलो तर त्यांना वाटते की आम्ही शिवसेना भवन फोडायला आलो की काय, पण वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असे वक्तव्य प्रसाद लाड यांनी केले होतं. यावर प्रसाद लाड यांनी शनिवारी फेसबुकद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे. प्रसाद लाड यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला असून यामध्ये त्यांनी आपल्या वाक्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं आहे. तसेच, आपल्या वक्तव्यामुळे कुणाचं मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, असेही लाड म्हणाले आहेत.

काय म्हणाले लाड?

प्रसारमाध्यांतून माझ्या भाषणाचा विपर्यास केला आहे. मी शिवसेना भवन फोडणार, अशा बातम्या दिसत आहे. पण यावर स्पष्टीकरण देऊ इच्छितो. असं मी काही करणार नाही. पण, जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा कारेला आरेनेचं उत्तर दिलं जाईल. ज्या शिवसेना प्रमुखांवर आम्ही प्रेम करतो, आदर ठेवतो. त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेना भवनाबद्दल माझ्याकडून तरी असं कोणतंही वक्तव्य केलं नाही. मला असं म्हणायचं होतं की, आम्ही माहीममध्ये जेव्हा येतो, तेव्हा एवढा बंदोबस्त ठेवला जातो, की जणूकाही आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत. या वक्तव्याचा प्रसारमाध्यमांत या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय. त्यावर माझं स्पष्टीकरण. मला कोणत्याही प्रकारे शिवसेना प्रमुख आणि शिवसेना भवनाबद्दल अनादर करायचा नव्हता.

हेही वाचा: ...म्हणून शांत! नाहीतर राणेंचं तोंड दोन मिनिटात बंद करु!

काय म्हणाले होते लाड?

भाजपच्या माहीम कार्यालयाबाहेर पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम गेल्या आठवड्यात पार पडला. या कार्यक्रमात बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या कार्यक्रमाला नितेश राणेही उपस्थित होते. यावेळी लाड म्हणाले की, नितेशजी, पुढील कार्यक्रमला कायकर्ते थोडे कमीच आणू. कारण आपण आलो की पोलिस जास्त येतात. फक्त पोलिसांना गणवेश घालून पाठवू नका, असे सांगायला पाहिजेच. कारण त्यांना तुमची आमची इतकी भीती आहे की आण माहीमध्ये जरी आलो तरी त्यांना वाटतं की हे शिवसेना भवन फोडणारच... काही घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू. या वक्तव्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.

हेही वाचा: झिका नेमका कसा पसरतो? जाणून घ्या, लक्षणे आणि उपचार

loading image
go to top