Dombivali News : शिवसेना भाजप मध्ये बॅनरबाजीची चढाओढ

श्री मलंग गडाच्या पायथ्याशी राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाची आजपासून सुरुवात होत आहे.
banner fight in shivsena bjp
banner fight in shivsena bjpsakal

डोंबिवली - श्री मलंग गडाच्या पायथ्याशी राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाची आजपासून सुरुवात होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जागोजागी करण्यात आली आहे.

एकप्रकारे शक्तिप्रदर्शन सेनेच्या वतीने केले जात असून दुसरीकडे भाजपने देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॅनर बाजी केली आहे. एकप्रकारे भाजप शिंदे गटात बॅनर बाजीची चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे.

ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वारकरी मंडळांच्या विद्यमाने श्रीमलंगगडाच्या पायथ्याशी कोकण प्रांतातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री मलंगगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या उसाटणे गावात हा सोहळा संपन्न होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या महोत्सवाला प्रमुख उपस्थिती असणार आहे तर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आहेत. तसेच उदघाटन सोहळ्या प्रसंगी अश्व रिंगण होणार असून या साठी थेट संत ज्ञानेश्वर माऊलींचे अश्व आणले जाणार आहे. यावेळी रिंगण सोहळ्यादरम्यान दिंडी वर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

काही वेळातच मुख्यमंत्री शिंदे हे या सोहळ्यास उपस्थित राहतील. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना शिंदे गटाकडून डोंबिवली, कल्याण-शीळ रोड, खोणी-तळोजा रोडवर मोठी बॅनर बाजी करण्यात आली आहे. रस्त्यावरील एकही खांब किंवा मोकळी जागा सोडण्यात आलेली नाही.

शिवसेना शिंदे गटाच्या बॅनर वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो झलकविण्यात आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात बॅनर बाजी करत एक प्रकारे शक्तिप्रदर्शन शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदारसंघात हा भाग येत असून त्यांनी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेले बॅनर लावत आपली ताकद देखील कमी नाही हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

शहरात जागोजागी हे लागलेले बॅनर म्हणजे एकप्रकारे शिवसेना शिंदे गट व भाजप यांच्यात चढाओढ सुरू असल्याचे चित्र दर्शवितात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com