पेंग्विनच्या शुल्काबाबत शिवसेना-भाजपमध्ये वाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

मुंबई - भायखळा येथील जिजामाता उद्यानातील पेंग्विन पाहण्यासाठी पाच रुपये शुल्क होते. ते आता थेट 100 रुपये करण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली आहे. येथे कोणत्याही सुविधा नसताना ही वाढ कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित करत भाजपने शुल्कवाढीला विरोध केला आहे. बाजार व उद्यान समितीत प्रस्ताव मंजूर झाला तेव्हा कुणीच का विरोध केला नाही, असा सवाल शिवसेनेने भाजपला केला आहे.

स्थायी समिती आणि महासभेच्या मंजुरीनंतर ही शुल्कवाढ लागू होणार आहे. याला मंगळवारी भाजपने विरोध केला. भाजपचे मुंबई अध्यक्ष ऍड. आशीष शेलार यांनी नागरिकांच्या खिशातून पेंग्विनचा खर्च भागवणार का, असे ट्‌विट करून शिवसेनेला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले आहे. आयुक्त अजोय मेहता यांना त्यांनी पत्रही पाठवले आहे.

हा प्रस्ताव मंजूर करताना कुणीही विरोध केला नाही. यापूर्वी गटनेत्यांच्या बैठकीतही तो मंजूर झाला आहे. त्यामुळे बाजार व उद्यान समितीत कुणीही विरोध केला नाही, अशी माहिती या समितीच्या अध्यक्ष सान्वी तांडेल यांनी दिली. आता स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करून घेण्याचे आव्हान शिवसेनेपुढे आहे.

Web Title: shivsena-bjp dispute in penguine fee