कल्याण-डोंबिवलीत बालेकिल्ल्यांवर नजर 

कल्याण-डोंबिवलीत बालेकिल्ल्यांवर नजर 

कल्याण - आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजायला सुरुवात झाली असून महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचे कल्याण आणि डोंबिवली शहर महत्त्वाचे केंद्र बनले आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कार्यक्रम आणि बैठकांच्या निमित्ताने शहरांना भेटी दिल्या. भाजपने शिवसेनेच्या कल्याण बालेकिल्ल्यात; तर शिवसेनेने भाजपच्या डोंबिवली बालेकिल्ल्यात महोत्सव आणि कार्यक्रमांनिमित्त शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे निवडणुकांचे वारे वाहू लागल्याचे चित्र आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आदी राजकीय मंडळींनी नुकतेच शहरांचे दौरे केले. शिवसेनेने डोंबिवली शहरात घेतलेला "श्रीनिवास मलंग महोत्सव' चर्चेचा ठरला. शहरभर केलेली फलकबाजी, आकर्षक प्रकाशयोजना, भव्यदिव्य नियोजनाच्या जोरावर मोठी गर्दी जमवत शिवसेनेने शक्तिप्रदर्शन केले. फडणवीस यांनी कल्याणमधील आगरी-कोळी महोत्सवाच्या व्यासपीठावर तडाखेबाज भाषण करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा कल्याण दौरा आणि उद्धव यांचा डोंबिवली दौरा चर्चेचा विषय बनला आहे. 

राममंदिराचा विषय शिवसेनेने लावून धरलेला असताना महोत्सवासाठी उपस्थित दीड लाख नागरिकांसमोर ठाकरे तिरुपती बालाजीच्या चरणी नतमस्तक झाले. त्यामुळे हिंदुत्ववादाचा मुद्दा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या अजेंड्यावर असणार यात शंकाच नाही. फडणवीस यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कल्याणमध्ये तीन कार्यक्रमांना उपस्थिती लावत मतदारांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कल्याण-डोंबिवली शहरांपासूनच निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाल्याचे चित्र आहे. 

ही निव्वळ नाटके! 
युती होणार की नाही याबाबत खलबते सुरू आहेत. शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे शक्तिप्रदर्शन करत आहेत; मात्र या दोन्ही पक्षांची ही नाटके असून ऐनवेळी ते हिंदुत्ववाद आणि सत्ता यासाठी एकत्र येतील, अशी टीका कॉंग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केली. 

"श्रीनिवास मलंग महोत्सव' हा धार्मिक उत्सव होता. तो डोंबिवलीत व्हावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. शिवसेना-भाजपमधील पक्षश्रेष्ठींचे लागोपाठ दौरे हा केवळ योगायोग होता. 
- राजेश मोरे, डोंबिवली शहरप्रमुख, शिवसेना 

युतीबाबत आम्ही सकारात्मक आहोत. मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा निश्‍चित होता. मित्रपक्षाचे पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्र्यांचे दौरे हा केवळ योगायोग आहे. 
- नरेंद्र पवार, आमदार, भाजप 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com