शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी काँगेसला दिला प्रस्ताव

शाम देऊलकर - सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

गुप्त वाटाघाटी सुरू

मुंबई: मुंबई महापालिकेत 84 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेससोबत गुप्त वाटाघाटी सुरू केल्याची माहिती विश्‍वसनीय सुत्रांनी दिली आहे. या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्‍वासू सहकाऱ्यांनी काँग्रेसला एक प्रस्ताव दिला आहे. आज जरी नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत युती आणि महापौरपदाच्या निवडणुकीच्या नियोजनाबाबत चर्चा होणार असली तरी महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसची मदत घेण्याची सेनेची मानसिक तयारी झाल्याचेही सांगितले जात आहे.

महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना, भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. निकालानंतरही सेना, भाजपमधील सत्तासंघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नसल्याने गुप्त बैठका, खलबतांच्या चर्चांनी मुंबई ढवळून निघाली आहे. काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घ्यायचा की त्यांना उपमहापौरपदासारखे पद द्यायचे याविषयी सेनेतील वरिष्ठ वर्तुळात खल चालू असल्याचे समजते. मुंबई महापौरपदाची निवड 9 मार्च रोजी होणार असल्याने येत्या काही दिवसांत राजकीय युती, आघाड्यांच्या या खेळातील गुंतागुंत अजुनच वाढण्याची शक्‍यता आहे. मुंबई पालिकेच्या सत्ता सोपानाच्या या स्पर्धेत सेना आणि काँग्रेसच्या प्रत्येक हालचालीवर भाजप नजर ठेऊन आहे. भाजपकडून काँग्रेसशी हातमिळवणीची अजिबात शक्‍यता नसली तरी इतर सर्व पर्याय भाजपकडून पडताळले जात आहेत. त्याचबरोबर सत्ता मिळवण्यासाठी जादुई आकड्याची गणिते सेनेच्या आमदार अनिल परब यांनी नाकारली असुन ज्या पक्षाच्या महापौरपदाच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतात त्या पक्षाचा महापौर होतो, असे सांगितले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीवेळी फ्लोअर मॅनेजमेंट महत्त्वाचे असेल आणि यात शिवसेना सहज यशस्वी होईल असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

काँग्रेसमध्ये कामतवगळता सर्व नेत्यांची मुकसंमती?
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरूदास कामत वगळता जवळजवळ सर्व नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत मुकसंमती दिल्याची चर्चा आहे. उघडपणे कोणी बोलण्यास तयार नसले तरी काँग्रेसमध्येही वेगाने हालचाली घडत आहेत. माजी मख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसकडे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले असुन दुसरे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रु नसतो असे वक्तव्य करून सेनेला पाठिंबा देण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. उत्तर प्रदेशच्या शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान 8 मार्चला होणार असल्याने काँग्रेस 9 मार्चला होणाऱ्या मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीत सेनेला अनुकूल भुमिका घेऊ शकते असे बोलले जात आहे.

Web Title: shivsena-congress Alliance in mumbai?