विनयभंगप्रकरणी भगत यांना जामीन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

नवी मुंबई - विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेले शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांना अलिबाग सत्र न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. पोलिसांकडून अटक टाळण्यासाठी भगत यांनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अलिबाग सत्र न्यायालयात धाव घेतली होती. या वेळी न्यायालयाने नामदेव भगत यास उरण पोलिस ठाण्यात २३ व २४ ऑगस्ट रोजी हजेरी लावण्याचे आदेश देताना जामिनावर पुढील सुनावणी १ सप्टेंबर रोजी ठेवली आहे. दरम्यान, पोलिस तपासानंतर खरी परिस्थिती समोर येईल, असे पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले. 

सिडकोचे माजी संचालक व विद्यमान शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी नेरूळ गावात राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीला आपल्या उरण तालुक्‍यातील दिघोडे येथील फार्महाऊसवर नेऊन विनयभंग केल्याची तक्रार सोमवारी (२० ऑगस्ट) उरण पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर भगत यांच्याविरोधात उरण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

 १ सप्टेंबरला सुनावणी 
अलिबाग सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर करताना येत्या २३ व २४ ऑगस्टला नामदेव भगत यांनी उरण पोलिस ठाण्यात जाऊन हजेरी द्यावी. त्यानंतर त्यांच्या जामिन अर्जावर येत्या १ सप्टेंबरला सुनावणी घेण्यात येईल, असे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती नामदेव भगत यांचे वकील ॲड. प्रवीण ठाकूर यांनी दिली.

Web Title: shivsena corporator namdev bhagat gets bail