खारघरमधील समस्या सोडवा - शिवसेनेची मागणी

गजानन चव्हाण
शुक्रवार, 20 जुलै 2018

खारघर (नवी मुंबई): सिडकोने खारघर मध्ये उभारलेल्या उत्सव चौकातील कारंजे अनेक दिवसांपासून बंद आहे. तसेच रस्त्याची दुरावस्था झाली आहे. सिडकोने कामे त्वरित हाती घ्यावे असे निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता गजानन दलाल यांना दिले. या शिष्टमंडळात रुपेश पाटील, उपशहर प्रमुख सुहास नागोटकर, पनवेल विधानसभा अवजड वाहतूक अध्यक्ष रोशन पवार, शाखा प्रमुख गिरीष गुप्ता, सचिन ठाकूर, राहुल गायकवाड आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

खारघर शहर विकसित करताना सिडकोने शिल्प चौक, उत्सव चौकची निर्मिती करून कारंजे उभारले आहे. मात्र उत्सव चौकातील कारंज्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून बंद आहे. तसेच वसाहती मधील रस्ते खड्डेमय झाली आहेत. त्यामुळे किरकोळ अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे. काही रस्त्यावर असलेले पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. या समस्यांकडे सिडकोने लक्ष देऊन तात्काळ कामे हाती घ्यावी अशा मागणीचे निवेदन दिले आहेत. 

Web Title: shivsena demand for solve the problems of kharghar