पक्षप्रवेश मुंबईत; तर 'डिल' लंडनमध्येच!

Shivsena enter deal between Sachin Ahir and Aditya Thackeray in London
Shivsena enter deal between Sachin Ahir and Aditya Thackeray in London

मुंबई : कुणालाही कानोकान कळू न देता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सचिन अहिर शिवबंधनात अडकले. यासाठी आदित्य ठाकरे यांनी विशेष प्रयत्न केले असून अहिर आणि ठाकरे यांच्यातली पक्ष प्रवेशाची 'डील' लंडनमध्ये झाल्याची माहिती मिळत मिळत असून तशी कबुलीच आदित्य ठाकरे आणि सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेशानंतर दिली.

लोकसभा निवडणुकीनंतर आदित्य ठाकरे मे महिन्यात लंडनमध्ये होते. त्याचवेळी सचिन अहिर आपल्या पत्नीसह आदित्य यांना एका हॉटेलमध्ये भेटले. यावेळी शिवसेना प्रवेशाबद्दल दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते आहे. यानंतर दोघांमधील मैत्री वाढत जाऊन एकमेकांना फोन आणि मेसेज सुरू होऊन आदित्य यांनी सचिन अहिर यांचं मनपरिवर्तन केल्याचं बोललं जातं आहे.

आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणारे सचिन अहिर त्यांचे जवळचे मित्र झाले. आदित्य यांच्या कामाची पद्धत आवडल्याने त्यांनी आदित्य यांची ऑफर स्वीकारली. यामुळे सचिन अहिर यांचा शिवसेना पक्ष प्रवेश ही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून झाला. अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने आदित्य यांच्या नेतृत्वावर ही शिक्कामोर्तब झाले असून उद्धव ठाकरे ही आदित्य यांच्यावर खूश असल्याचे समजते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com