संजय राऊत यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट, भेटून झाल्यावर म्हणालेत...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना अनेक दिवस व्यक्तिशः भेटलो नव्हतो - संजय राऊत 

मुंबई - महाराष्ट्रात कोरोना सोबतच राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. केवळ एकाच कारणावरून नव्हे तर विविध कारणांवरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तंग झालंय.

अशात सर्वांच्या भुवया आज उंचावल्यात त्या शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि  राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर. एकीकडे कोरोनाचा कहर तर दुसरीकडे महाराष्ट्रात राज्य विरुद्ध राज्यपाल अशी वाढलेली दरी. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी घेतलेली भगतसिंग कोश्यारी यांची भेट महत्त्वाची मनाली जातेय.

राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वाद पु्न्हा उफाळून येणार! वाचा काय आहे प्रकरण...

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना अनेक दिवस व्यक्तिशः भेटलो नव्हतो, आणि त्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी राज्यपालांना भेटलो असं संजय राऊत म्हणालेत. राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहेत असं देखील संजय राऊत म्हणालेत. एखाद्या पिता पुत्राप्रमाणे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संबंध मधुर आहेत. आमच्यात दऱ्या वैगरे काही पडत नाहीत, असंही संजय राऊत माध्यमांना म्हणालेत.  

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर आहेत, एखाद्या पिता-पुत्राचे त्यांचे संबंध आहेत, तसेच राहावेत, दऱ्या वगैरे आमच्यात काही पडत नाहीत, असंही यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं. यापुढे बोलताना राऊत यांनी परीक्षांच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं.

मोठी बातमी - मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची आत्महत्या...

शेवटच्या वर्षांच्या परीक्षेबाबत वैयक्तिक मत उदय सामंत यांनी मांडलं राज्यापाल हे कुलपती आहेत. त्यांनी देखील स्वतःचं मत मांडलं. आता याबाबत सरकारमधील मंत्री निर्णय घेतील. दरम्यान महाराष्ट्रात काय सुरु आहे याची माहिती घेण्याचा राज्यपालांना अधिकार आहे. सरकारकडून राज्यपालांना ही माहिती दिली जाते. 

याचसोबत राऊत यांनी विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनावर देखील भाष्य केलंय. आंदोलनाचा अधिकार विरोधकांना असल्याचं मत संजय राऊत यांनी मांडलंय. मात्र देशातील सध्याची परिस्थिती पाहता त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी असं देखील मत संजय राऊत यांनी म्हटलंय. 

shivsena firebrand leader sanjay raut meets governor of maharashtra at rajbhavan

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena firebrand leader sanjay raut meets governor of maharashtra at rajbhavan