मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्र परीसर केंद्राला आनंद दिघे यांचे नाव | Anand Dighe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anand Dighe

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्र परीसर केंद्राला आनंद दिघे यांचे नाव

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) ठाणे उपकेंद्र परिसराला शिवसेनेचे (shivsena) तत्कालीन जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचे नाव देण्यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंगळवारी (ता. २९) ठराव संमत करण्यात आला आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाणे उपकेंद्र परिसराला आनंद दिघे यांचे नाव दिले जावे, असे निवेदन मुंबई विद्यापीठाला दिले होते. युवा सेनेच्या (Yuvasena) सदस्यांनी या निवेदनाचा आधार घेत व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा विषय चर्चेला आणला होता.

हेही वाचा: दरेकरांच्या अडचणीत वाढ? बँक घोटाळ्याप्रकरणी आम आदमी आक्रमक

त्या पार्श्वभूमीवर परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी ठराव मांडला असता, तो एकमताने संमत करण्यात आला. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य ॲड. नील हेळेकर यांनी मात्र ठाणे उपकेंद्र परिसराला नाव देण्याच्या ठरावावर नाराजी व्यक्त केली. मुंबई विद्यापीठाच्या डी.लीट पदवीसोबतच विद्यापीठाच्या परिसर उपकेंद्राला नाव देताना त्या त्या व्यक्तीचे विद्यापीठ आणि त्या संदर्भातील योगदान लक्षात घेतले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मुंबई विद्यापीठासाठी मोठे योगदान असलेल्या अनेकांची यादी त्यांनी या वेळी वाचून दाखवली. दिघे यांचे नाव दिले जात असल्याने विद्यापीठासंदर्भातील त्यांचे योगदान हे लक्षात घेतले जावे, अशी मागणीही त्यांनी केली. मात्र, व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील बहुसंख्य सदस्यांनी दिघे यांचे नाव ठाणे परिसर उपकेंद्राला देण्याच्या ठरावाला संमती दिल्याने तो एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: Shivsena Former Leader Anand Dighe Name Given For Mumbai University Thane Epicenter As Proposal Sanctioned In Council

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..