दशावतारातील बालगंधर्वाला शिवसेनेचा मदतीचा हात

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 डिसेंबर 2016

मुंबई - दशावतारातील बालगंधर्व अशी ख्याती असलेले ओमप्रकाश चव्हाण (रा. आंबडोस-नांदरूख, जि. सिंधुदुर्ग) यांना शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना कळताच त्यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला आहे. बांदेकर प्रमुख अतिथी असलेल्या मागाठणे येथील कोकण महोत्सवात ओमप्रकाश कार्यक्रम सादर करणार होते. गोवा येथे रंगमंचावर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते येणार नसल्याचे बांदेकर यांना समजले.

ओमप्रकाश दर वर्षी कोकण महोत्सवात कला सादर करतात. प्रकृती ठीक नसल्याने आणि शस्त्रक्रियेची गरज असल्याने ते या वर्षी कोकण महोत्सवात सहभागी होणार नाहीत, अशी माहिती महोत्सवाच्या आयोजकांकडून शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना समजली. ओमप्रकाश यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन आयोजकांनी केले. यावर लगेचच बांदेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली. ठाकरे यांनी लगेचच आर्थिक मदत करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे कोकण महोत्सवात बांदेकर यांनी ही मदत जाहीर केली.

शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष बांदेकर आणि चित्रपट सेनेचे सचिव भूषण चव्हाण यांनी ओमप्रकाश यांना आर्थिक मदतीचा धनादेश त्यांच्या आंबडोस-नांदरूख येथे घरी जाऊन सुपूर्द केला. या आजारी कलावंताने या घरपोच मिळालेल्या मदतीकरिता शिवसेनेचे आभार मानले.

Web Title: shivsena help to dashavatar balgandharv