esakal | उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व करावे: संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व करावे: संजय राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व करावे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसंच देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत असून देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतलं जाईल, असा निशाणाही राऊत यांनी फडणवीसांना लगावला आहे.

उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व करावे: संजय राऊत

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व करावे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसंच देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत असून देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतलं जाईल, असा निशाणाही राऊत यांनी फडणवीसांना लगावला आहे. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, झारखंड, राजस्थान, पश्चिम बंगाल, ओरिसा, पंजाब, आंध्र प्रदेश ही बिगर भाजपशासित राज्ये आहेत. 

संजय राऊत यांनी काँग्रेसवरही आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसमध्ये जे काय घडलं, त्यावर काँग्रेसनं बोललं पाहिजं. काँग्रेस हा देशाला माहित असलेला मोठा पक्ष आहे, विरोधी पक्ष आहे. तसंच देशाला मजबूत विरोधीपक्षाची गरज असल्याचं राऊत म्हणालेत. पुढे राऊत म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण हे मोठे नेते आहेत. संपूर्ण देशात ज्यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते काम करतील ते राहुल गांधीच आहेत. ते सक्षम सुद्धा आहेत. काँग्रेसनं या वादळातून स्वतःला सावरावं आणि जमिनीवर काम करावं, असंही ते म्हणालेत. 

हेही वाचाः  मुंबईकरांवरील पाणीटंचाईचा प्रश्न मिटला, केवळ 'इतके' टक्केच जलसाठा कमी

महाविकास आघाडीत उत्तम समन्वय आहे. जी समन्वय समिती आहे. ती मंत्रालय कामकाजासाठी आहे. तिन्ही पक्षांमध्ये अशी एक समन्वय समिती असावी असं महाविकास आघाडीत वाटत होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी गरज नसल्याचं म्हटलं होतं. मात्र आता पुन्हा विचार करणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

अधिक वाचाः  नाहीतर लोक प्रॉपर्टी चोरुन नेतील, शिवसेनेचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा

गेल्या काही दिवसात निधी वाटपावरुन काँग्रेस आमदार नाराज असल्याचं समोर आलं होतं. याबाबत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवरच निशाणा साधला. "तीन पक्षाचं सरकार असताना निधी वाटपास आमदार आणि खासदारांची नाराजी आहे. पण केंद्राने निधी गोठवल्यामुळे अडचण असल्याचं संजय राऊत म्हणालेत.

Shivsena Leader Sanjay Raut opinion cm uddhav thackeray lead non bjp led states