डॉक्टर आणि कंपाउंडर यांच्यावरील वक्तव्यावर संजय राऊतांचं राऊतांच रोकठोक स्पष्टीकरण, म्हणालेत...

सुमित बागुल
Monday, 17 August 2020

डॉक्टर मंडळी आमचीच आहेत. त्यामुळे त्यांना आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य आहे.

मुंबई : एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात संजय राऊत यांनी डॉक्टर आणि कंपाउंडर यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. 'ते' वक्तव्य वादात सापडलं आणि संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी अशी मागणी IMAच्या डॉक्टरांकडून केली जातेय. यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलंय. आपल्याकडून डॉक्टरांचा अपमान अजिबात झालेला नाही. अपमान आणि कोट्यांमधील फरक समजून घ्यावा असं संजय राऊत म्हणालेत. या सोबतच WHO ही राजकीय संघटना बनली असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केलाय. 

डॉक्टर मंडळी आमचीच आहेत. त्यामुळे त्यांना आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य आहे. जेव्हा जेव्हा डॉक्टरांवर संकटं आलीत तेंव्हा तेंव्हा मी स्वतः डॉक्टरांच्या मदतीला गेलोय. गेल्या काही दिवसांमध्ये डॉक्टरांकडून कोरोना रुग्णांकडून अफाट बिलं दिली जातायत. त्यावेळी डॉक्टरांविरोधात आंदोलनं देखील झालीत. तेंव्हा  डॉक्टर हे कोरोनाकाळात योद्ध्याची भूमिका बजावतायत आणि त्यांच्याविरोधात अशी भूमिका घेणं योग्य नाही. त्यामुळे त्यांच्यावर हल्ले करणं, तोडफोड करणं, त्यांच्याविषयी बदनामीकारक बोलणं हे आपल्या संस्कृतीला शोभत नाही. हे समजावून मी अनेक डॉक्टरांकडे पोहोचलेलो आहे. अनेक वेळा डॉटरांच्या साठी मध्यस्ती मी केलीये. मी कायम डॉक्टरांच्या बाजूने उभा राहिलोय हे सगळ्यांना माहिती आहे. 

मोठी बातमी शरद पवारांची ब्रीच कँडीमध्ये झाली कोरोना टेस्ट, रिपोर्टबद्दल राजेश टोपे म्हणालेत...
 

ते तितकंसं बरोबर नाही 

डॉक्टरांच्या आतापर्यंतच्या संपांमध्ये मी स्वतः डॉक्टरांची बाजू भक्कमपणे मांडली आहे. मी काय बोललो आणि काय सांगितलं हे समजून न घेता एका विशिष्ट विचाराचे राजकीय लोकं ही मोहीम चालवत असतील आणि वैद्यकीय क्षेत्र आणि डॉक्टर मंडळी आपल्याच पाठीशी आहेत असा आभास निर्माण करणार असतील तर ते तितकंसं बरोबर नसल्याचंही संजय राऊत म्हणालेत. 

माझ्याकडून डॉक्टरांचा कुठेही अपमान झालेला नाही

माझ्याकडून डॉक्टरांचा कुठेही अपमान झालेला नाही. माझी ती भावनाही नव्हती. अपमान आणि कोटी यातला फरक समजून घेतला पाहिजे. देशातील डॉक्टर हे एवढे अचाट आणि अफाट आहेत की त्यांनी कंपाउंडर देखील इतक्या ताकदीचे बनवलेत जे डॉक्टरकीचं काम करू शकतात. हा खरंतर डॉक्टरांचा बहुमान आहे. त्यामुळे माझ्या मनात डॉक्टरांच्या सर्व सहकार्यांविषयी आदर राहिलाय. मी कंपाउंडरचा सन्मान केला म्हणून एक विशिष्ट राजकीय पक्षाच्या विचाराशी संबंधित असलेल्या आमच्या डॉक्टर मंडळींना इतकी टोकाची भूमिका घेणं योग्य नाही. 

मोठी बातमी - शाब्बास मुंबईकर !  मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 80 टक्क्यांवर...

माझ्याकडून डॉक्टरांचा झालेला नाही

आमचे सर्व डॉक्टर्स या सध्याच्या काळात अत्यंत कठोर परिश्रम करतायत आणि अनेकांनी आपले प्राण गमावलेत. मी याचं जाहीरपणे सामानातून कौतुकही केलंय.  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील डॉक्टरांचं कौतुक केलंय. तरीही माझ्याकडून त्यांचा अपमान झालाय असं का वाटतंय असा प्रश्नही संजय राऊतांनी उउपस्थित केलाय. अशा कोणत्याही प्रकारचा अपमान माझ्याकडून डॉक्टरांचा झालेला नाही  याबाबतचं राजकारण थांबायला हवं. मी माझं वक्तव्य WHO साठी केलेलं. त्यामुळे आपल्याकडच्या डॉक्टरांना त्या वक्तव्याबाबत एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं संजय राऊत म्हणालेत. 

shivsena leader sanjay rauts clarification on doctors and compounders

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena leader sanjay rauts clarification on doctors and compounders