esakal | उल्हासनगर: शिवसेनेच्या 'या' आमदाराकडून वाढदिवसानिमित्त 'वॅगन आर' गिफ्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Dr balaji kinikar

उल्हासनगर: शिवसेनेच्या 'या' आमदाराकडून वाढदिवसानिमित्त 'वॅगन आर' गिफ्ट

sakal_logo
By
दिनेश गोगी

उल्हासनगर : श्रीलंकेतून (shrilanka) 54 वर्षांपूर्वी येऊन गेल्या पाच दशकापासून उल्हासनगरात (Ulhasnagar) धम्मप्रचाराची धुरा सांभाळणारे आणि अनेक वर्षांपासून महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटी या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष पद भूषवणारे भन्ते डॉ.आनंद महाथेरो (Dr aanand mahathero) यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे शिवसेनेचे अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ.बालाजी किणीकर (dr balaji kinikar) यांनी वॅगणार कारची गिफ्ट दिली आहे.भन्तेजींच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त डॉ.किणीकर यांनी त्यांना वॅगणार कारची अनपेक्षित गिफ्ट दिल्याने डॉ.किणीकर यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.

हेही वाचा: सामाजिक संस्कारांना महत्व हवे; साकीनाका घटनेवर महिला नेत्यांच्या प्रतिक्रिया

भन्ते डॉ.आनंद महाथेरो यांना अनेक शहरात धम्मप्रचारासाठी जावे लागते.त्यांचा 74 वा वाढदिवस असून त्यांना एखादी कार गिफ्ट करावी अशी विनंती आमदार डॉ.बालाजी किणीकर यांचे निकटवर्तीय,आधार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदीप डोंगरे यांनी डॉ. किणीकर यांच्याकडे केली होती.आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मोठे झालोत याची जाणीव असणारे डॉ.किणीकर यांनी डोंगरे यांच्या विनंतीला प्राधान्य देऊन धम्मप्रचारासाठी आयुष्य खर्ची करत असणारे भन्ते डॉ.आनंद महाथेरो यांना कार गिफ्ट केली.वाढत्या वयामुळे प्रवास करताना आपणास कुठेही अडचण येऊ नये व धम्मप्रचाराच्या कार्याला अधिक बळकटी मिळो अशा शुभेच्छा यावेळी आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी भन्तेजी डॉ.महाथेरो यांना दिल्या. याप्रसंगी श्रीलंकेचे राजदूत वॉलसन वथुडी,संघमित्रा वंदना संघाच्या उपासिका,उपासक,शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

loading image
go to top