esakal | सामाजिक संस्कारांना महत्व हवे; साकीनाका घटनेवर महिला नेत्यांच्या प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai crime

सामाजिक संस्कारांना महत्व हवे; साकीनाका घटनेवर महिला नेत्यांच्या प्रतिक्रिया

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : निर्भया नंतर साकिनाक्यासारख्या घटना (sakinaka woman rape case) घडल्यावर फक्त चर्चा करू नये तर समाजाची मानसिकता बदलण्यासाठी (people mentality) सर्वांनीच एकत्र येणे गरजेचे आहे. मुलांना योग्य लैंगिक शिक्षण (Sex education) देतानाच सहज उपलब्ध होणाऱ्या अश्लील व्हिडियोंना (Porn videos ban) आळा बसला पाहिजे, असे मत सर्वपक्षीय प्रमुख महिला नेत्यांनी (women's statement) व्यक्त केले आहे.

हेही वाचा: Sakinaka Case: "आम्ही गरीब आहोत, आम्हाला न्याय द्या"

साकीनाका घटनेचा निषेध करताना रुपाली चाकणकर, चित्रा वाघ, मनीषा कायंदे, विद्या चव्हाण आदी महिला नेत्यांनी अनेक उपाय सुचविले आहेत. यात महिला अॅट्रॉसिटीचे गुन्हे निश्चित करण्यापासून, मुलांना लैंगिक शिक्षण तसेच संस्कार द्यावेत, फास्ट ट्रॅक कोर्टात खरोखरीच जलद निकाल मिळावेत, अशा सर्व सूचनांचा समावेश आहे. मात्र हातातल्या फोनमधून सहज उपलब्ध होणाऱ्या अश्लील चित्रफीती, चित्रपटांमध्ये बोकाळलेली अश्लीलता यांनाही आळा बसावा, अशीही गरज सर्वपक्षीय महिला नेत्यांनी व्यक्त केली.

समाजप्रबोधनासाठी एक व्हा

आज आपल्याकडे कठोर कायदे आहेत, फास्ट्र ट्रॅक कोर्ट आहे, पण जेथे बापच मुलीवर अत्याचार करतो त्याला कोण रोखणार. त्यामुळे समाजाची मानसिकता बदलण्यासाठी, समाजप्रबोधन करण्यासाठी सर्वांनीच एकत्र आले पाहिजे. अश्लील व्हिडियो आणि वेबसिरीज यांना आळा घालण्याची मागणी आमच्या खासदारांनीही केंद्राकडे केली आहे. शालेय जीवनातच मुलांना लैंगिक शिक्षण द्यावे, माणसांच्या कळपात वावरणाऱ्या या हिंस्त्र जनावरांना आळा घातलाच पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सकाळ कडे व्यक्त केले.

वूमन अॅट्रॉसिटी आणा

महिलांविरुद्धचे प्रमुख गुन्हे उदा. कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, विनयभंग यांना तज्ञांच्या साह्याने वूमन अॅट्रॉसिटीच्या व्याख्येअंतर्गत बसवावे. त्यासाठी विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करावे, या गुन्हेगारांना अटकपूर्व जामीन मिळणार नाही अशी तरतूद करावी, असे राज्य भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सकाळ ला सांगितले. अशाच तरतूदींमुळे आता महाराष्ट्रात अनुसुचित जाती जमातींविरुद्धचे गुन्हे कमी झाल्याचेही त्यांनी दाखवून दिले.

हेही वाचा: पत्नीने दुसरा विवाह केला नसेल तर पतीच्या मालमत्तेमध्ये हिस्सा - हायकोर्ट

मर्सी पिटीशन नको

स्त्रीयांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये न्यायदान त्वरेने व्हायला हवे, त्याला ठराविक कालमर्यादा हवी. निर्भया प्रकरणातही आरोपींना आठ वर्षांनंतर फाशी झाली, त्यासाठी मर्सी पिटिशनवरही नियंत्रण हवे. पोलिस-वकील आदींनीही पिडीत महिलेच्या बाजूने उभे रहावे, समाजप्रबोधन व्हावे, पण त्यात फक्त मुलींनाच शिकवले जाऊ नये. घरोघरी आई जेव्हा मुलाचा कान पकडेल किंवा वडील जेव्हा आईला मान देतील तेव्हा या बदलाची सुरुवात होईल. एरवी गस्तीसाठी ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञांनाचा उपयोग करून घेता येईल, असे मत शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी सकाळ कडे व्यक्त केले.

मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्या

समाजमाध्यमे, चित्रपट, वेबसिरीज येथे बोकाळलेल्या अश्लीलतेकडे पाहून आपण कोठे चाललो आहोत हेच कळत नाही. आपण मुक्त सेक्स च्या युगाकडे चाललो आहोत, असे वाटते आहे. आपण व्हॅलेंटाईन डे ला विरोध करतो आणि अशा घटना घडल्या की जागे होतो. या घटना रोखण्यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेऊन एकत्र विचार करावा. दुसरे म्हणजे शालेय जीवनापासूनच मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार विद्या चव्हाण यांनी व्यक्त केले.

loading image
go to top