पळून जायला मी विजय मल्ल्या किंवा नीरव मोदी नाही- प्रताप सरनाईक

pratap sarnaik
pratap sarnaik
Summary

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक सार्वजनिक व्यासपीठावर दिसले नव्हते. ते आज विधानभवनात दिसून आले आहेत. ईडीचा ससेमिरा मागे लागल्यामुळे ते गायब असल्याची चर्चा होती.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक सार्वजनिक व्यासपीठावर दिसले नव्हते. ते आज विधानभवनात दिसून आले आहेत. ईडीचा ससेमिरा मागे लागल्यामुळे ते गायब असल्याची चर्चा होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, ''संपूर्ण देशात माझ्यावर कोठेही एफआयआर दाखल नाही. माझ्याविरोधात कोणी वक्तव्य केलेलं नाही. माझ्याविरोधात जे आरोप होते त्याविरोधात सुप्रीम कोर्टाने मला संरक्षण दिलं आहे. त्यामुळे ईडीचा ससेमिरा लागला आणि मी गायब झालो अशातली गोष्ट नाही.'' (shivsena mla pratap sarnaik said about his missing)

माझ्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली आहे. माझी पत्नी कँसरशी झगडत आहे आणि माझ्या कुटुंबातील अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. अशा परिस्थितीत मी काही दिवस शांत राहण्याचा निर्णय घेतला. मी नीरव मोदी, मेहुल चौक्सी किंवा विजय मल्ल्या नाही की गायब होणार, बाहेर जाणार. ही वस्तूस्थिती आहे. ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याची वेळ आली, त्यावेळी आमदारांची बैठक झाली. त्यानंतर मी याबाबत घोषणा केली होती. महाविकास आघाडीच्या सर्व घडामोडींमध्ये मी काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांची विचारपुस केली. महाविकास आघाडीवर जेव्हा जेव्हा विरोधकांनी टीका केली, तेव्हा पक्षाचा प्रवक्ता म्हणून मला जबाबदारी देण्यात आली होती, असं सरनाईक म्हणाले.

pratap sarnaik
गडकरींना अडचणीत आणणाऱ्या पत्रावर चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

सुरुवातीच्या काळात मी अर्णव गोस्वामीच्या प्रकरणात आवाज उठवला होता. अभिनेत्री कंगना रनावत याने जे मुख्यमंत्री आणि पोलिसांविरोधात वक्तव्य केले होते, याप्रकरणावरही मी आवाज उठवला होता, असं प्रताप सरनाईक म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सरनाईक कोणत्याही सार्वजनिक व्यासपाठीवर दिसले नव्हते. त्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला होता. त्यांची चौकशी होत होती. त्यामुळे ते गायब असल्याची चर्चा सुरु झाली होती. पण, सरनाईक यांनी यात वास्तव नसल्याचं म्हटलं आहे. कौटुंबिक कारणामुळे आणि आरोग्य अस्वास्थ्यामुळे मी सार्वजनिक व्यासपीठावर आलो नसल्याचं ते म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com