गडकरींना अडचणीत आणणाऱ्या पत्रावर चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

chandrakant patil nitin gadkari
chandrakant patil nitin gadkari
Updated on
Summary

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सरकारी बँकासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले आहे. चंद्रकात पाटील यांनी अमित शहा यांना 52 साखर कारखान्यांची नावे दिली असून याबाबात चौकशी करण्याची विनंती केली आहे.

मुंबई- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सरकारी बँकासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले आहे. चंद्रकात पाटील यांनी अमित शहा यांना 52 साखर कारखान्यांची नावे दिली असून याबाबात चौकशी करण्याची विनंती केली आहे. या पत्रामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलाच्या मालकीच्या दोन कारखान्यांचाही समावेश आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. याप्रकरणी अधिवेशनाच्या आधी चंद्रकात पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (chandrakant patil explanation on letter trouble for nitin gadkari)

जरंडेश्वर कारखाना ईडीने जप्त केल्याप्रकरणी अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात मी म्हटलं की जरंडेश्वर कारखान्यावरील कारवाई ही हिमनगाचे टोक आहे. पण, सात-आठ वर्षांपूर्वी राज्य बँकांनी कर्ज दिलेले कारखाने तोट्यात दाखवून, त्यांचा लिलाव काढून, कमी किंमतीमध्ये खरेदी करुन कितीतरी अधिक कर्ज काढण्यात आले. तरी कारखाने नाही चालले तर ते विकले. अशाप्रकारचा स्कॅम झाला. यावर काही वर्षांपूर्वी एक याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेमध्ये कोणते कोणते कारखाने राज्य सरकारने कमी किंमतीमध्ये विकले याची यादी दिली. या यादीला कोट करुन मी अमित शहा यांना पत्र लिहिलं की, याबाबत चौकशी व्हायला पाहिजे, असं पाटील म्हणाले.

या यादीमधील दोन कारखाने नितीन गडकरी यांनी विकत घेतलेले आहेत. पण, ज्यावेळी हायकोर्टात 7-8 वर्षांपूर्वी याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचवेळी गडकरी यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की, 'बँकाने ठरवलेल्या किंमतीपेक्षा कितीतरी पटीने अधिक किंमतीने हे मी विकत घेतले आहेत. यावर अवाच्या सव्वा कर्ज काढलेलं नाही. लोकांच्या आग्राहास्तव मी कारखाने घेतले आहेत.' मीही या मुद्दावर नवीन काही म्हटलेलं नाही. हायकोर्टात जी याचिका दाखल करण्यात आली आहे. जे कारखाने मातीमोल किंमतीनी खरेदी करण्यात आले आहेत, त्याच्या चौकशीची मी मागणी केली आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांनी खरेदी केलेले कारखाने बँकानी जेवढी किंमत ठरवली होती, त्यापेक्षा अधिक किंमतीत खरेदी केले आहेत. तरीही, स्वत: नितीन गडकरी यांनी कोणत्याही चौकशीची तयारी दाखवली आहे. त्यामुळे स्वत:चे अपराध वाचवण्यासाठी गडकरी यांचे दोन कारखाने समोर आणून दाखवणे योग्य नाही, अशी टीका पाटील यांनी विरोधकांवर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Farmer Earns Premium Price as Sugarcane Fetches ₹5,000 Per Tonne
solapur city
The Pune Municipal Corporation has approved medical assistance for the families of former corporators under its contributory healthcare scheme.
Students Get Financial Boost as Monthly Hostel Meal Grant Raised to ₹3,200
Marathi News Esakal
www.esakal.com