सेनेलाही बंडाळीचा फटका; आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 जुलै 2019

काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेनेलाही बंडाळीचा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेचे वरळीचे आमदार सुनील शिंदे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेनेलाही बंडाळीचा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेचे वरळीचे आमदार सुनील शिंदे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानं सुनील शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधल्याचेही सांगण्यात येत असून लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, काल सचिन अहिर यांनी राष्ट्रादीतून शिवसेनेत प्रवेश केल्यावर मुंबईतील कट्टर शिवसैनिक नाराज झाले असल्याचे सांगण्यात येत असून याचा फटका शिवसेनेला बसण्याची चिन्हे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MLA Sunil Shinde may Enter in NCP