esakal | अजित पवारांबाबत सर्व निर्णय शरद पवार घेतील : संजय राऊत

बोलून बातमी शोधा

Shivsena MP Sanjay Raut speaks with media on 28 Nov

महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा दाखवत आलाय. आमचं महाविकासआघाडीचे सरकार पाच वर्ष टिकेल. अजित पवारांबाबत सर्व निर्णय शरद पवार घेतील,' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

अजित पवारांबाबत सर्व निर्णय शरद पवार घेतील : संजय राऊत
sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : 'आज महाराष्ट्रासाठी आणि शिवसेनेसाठी ऐतिहासिक दिवस आहे. तब्बल 20 वर्षांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय, त्यामुळे शिवसेनेसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा दाखवत आलाय. आमचं महाविकासआघाडीचे सरकार पाच वर्ष टिकेल. अजित पवारांबाबत सर्व निर्णय शरद पवार घेतील,' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः फोन करून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्राचे सर्व सहकार्य राज्याला मिळेल असे आश्वासनही मोदींनी ठाकरेंना दिलंय. तसेच सोनिया गांधी आजच्या शपथविधीला सोहळ्या उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. अजित पवार शपथ घेणार का, याबाबत विचारले असता, अजित पवारांबाबत सर्व निर्णय हे शरद पवार घेतील. तर आदित्य ठाकरेंना राज्यमंत्रीपद देण्याबाबदत उद्धव ठाकरे निर्णय घेतील. महाविकासआघाडीत कोणत्याही प्रकारची धुसफूस नाही. आम्ही तीनही पक्ष एकत्र बसून योग्य निर्णय घेतो, असेही राऊतांनी यावेळी सांगितले.   

राज्यात आजपासून उद्धव सरकार  

महाराष्ट्रात आता महाविकासआघाडीचे सरकार आल्याने केंद्राच्या आखत्यारित असलेल्या संस्थाचा गैरवापर केला जाईल, तो आम्ही होऊ देणार नाही. आता पर्यंत केंद्र सरकार अशा संस्थांचा गैरवापर करत आले, आता मात्र आम्ही तसे होऊ देणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. 

संजय राऊत म्हणतात, How is Josh?
शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यात मोलाचा वाटा उचलणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजही (गुरुवार) ट्विट करत How is Josh? असा प्रश्न राज्यातील नागरिकांना केला आहे. तसेच त्यांनी जनतेला जय महाराष्ट्र असेही म्हटले आहे.

शपथविधी सोहळ्यासाठी नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंचं निमंत्रण

राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. उद्धव ठाकरे  मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी केली असून, राज्यभरातून एक लाख शिवसैनिक येणार आहेत. शिवाय देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील सोहळ्यासाठी बोलावण्यात आले आहे.