esakal | आमचं सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरलं : संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena MP Sanjay Raut speaks at Press Conference on 27 Nov

मी देवेंद्र फडणवीसांवर काहीही बोलू इच्छित नाही. पण आज बाळासाहेब ठाकरेंची खूप आठवण येतेय,' असे उद्गार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत काढले.  

आमचं सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरलं : संजय राऊत

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : 'महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झालंय, नवी पहाट उगवली आहे. भाजपला आघोरी प्रयत्न करूनही आपला मुख्यमंत्री जनतेवर लादता आला नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले म्हणजेच परिवर्तनाला सुरवात झाली. महाराष्ट्राच्या जनतेने पलटवार केलाय. मी देवेंद्र फडणवीसांवर काहीही बोलू इच्छित नाही. पण आज बाळासाहेब ठाकरेंची खूप आठवण येतेय,' असे उद्गार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत काढले.  

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

'परिवर्तानाची सुरवात ही महाराष्ट्रात झाली. आता इतर राज्यात आता काय होतंय बघू. देशात असली बळजबरी चालणार नाही आणि आम्ही ती खपवूनही घेणार नाही. मी चाणक्य वैगरे नाही मी योद्धा आहे, जीवनात परिणामांची चिंता मी केली नाही, बाळासाहेबांनी मला नेहमी आशीर्वाद दिले आहेत. आमचं सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरलं आहे, असेही राऊतांनी यावेळी सांगितले. 

महाविकासआघाडीची उजडली 'पहाट'; आमदारांचे शपथविधी सुरु

मला पवारसाहेब म्हणाले की, संजय आता आपलं काम झालं, आता आपल्यासला दिल्लीत जाऊन बसावं लागेल. आमची जबाबदारी आम्ही पार पाडली, आता माझी जबाबदारी संपली आहे, आता मुख्यमंत्र्यांची जबाबदारी वाढली, असे राऊत म्हणाले. तसेच अजित पवारांवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, अजित पवारांनी शपथ घेतली तेव्हाच मी म्हणालो होतो की ते परत येणार आणि ते परत आले. 

79 वर्षांच्या वस्तादाचे डाव पैलवानांना कळलेच नाही