संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून नवा वाद; भाजपची माफीची मागणी 

टीम ई-सकाळ
Saturday, 15 August 2020

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्या संजय राऊत यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले.

मुंबई : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या एका वक्तव्यावरून पुन्हा एकदा वाद उफाळून आलाय. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना संजय राऊत यांनी डॉक्टरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून भाजपनं त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलाय. संजय राऊत यांनी डॉक्टरांची माफी मागावी अशी मागणी भाजपकडून होत आहे. 

मुंबईतील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय घडले? 
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्या संजय राऊत यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागारपदी नियुक्ती झाल्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना मुंबईतील साथीच्या रोगांची परिस्थिती हाताळण्याचा अनुभव असल्याचा खुलासा केला. त्याचवेळी त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर टीकाही केली. जागतिक आरोग्य संघटनेत तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे, उद्धव ठाकरे डॉक्टर नाहीत, यावर संजय राऊत यांनी 'मी कधीही डॉक्टरांकडून औषध घेत नाही. कम्पाउंडरकडून औषध घेतो. त्यांना जास्त अनुभव असतो.', असे वक्तव्य केले होते. 

आणखी वाचा - सचिन तेंडुलकर सांगतोय, 'तुम्ही तुमच्या मुलांचे हिरो बना'

भाजपची माफीची मागणी
संजय राऊत यांनी डॉक्टरांविषयी विधान करून, वैद्यकीय क्षेत्राचा आणि डॉक्टरांचा अपमान केला आहे, असं मत भाजपकडून व्यक्त करण्यात आलंय. कोरोना साथीच्या काळात डॉक्टरांनी सेवा दिली आहे. त्या कोरोना यौद्ध्यांचा संजय राऊत यांनी अपमान केलाय, असं मत भाजपनं व्यक्त केलं असून, भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी 'संजय राऊत यांनी डॉक्टारांची माफी मागावी', अशी मागणी केलीय. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena mp sanjay raut statement on doctors bjp asks for apology