संजय राऊत म्हणतात, 'अग्नीपथ अग्नीपथ अग्नीपथ...'

टीम ईसकाळ
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

शरिरावर इतकी मोठी शस्त्रक्रिया होऊनही संजय राऊत हार न मानता दररोज सूचक ट्विट करत आहेत. आजही असेच विशेष ट्विट त्यांनी केलंय. 

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत दररोज काही ना काही ट्विट करून चर्चेत असतात. दोन दिवसांपूर्वी (ता. 11) राऊतांची अँजिओप्लास्टी झाली. तरीही त्यांनी काल सकाळी व आजही थेट लीलावतीमधून ट्विट केले आहे. शरिरावर इतकी मोठी शस्त्रक्रिया होऊनही संजय राऊत हार न मानता दररोज सूचक ट्विट करत आहेत. आजही असेच विशेष ट्विट त्यांनी केलंय. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

संजय राऊत नेहमीच काही निवडक कवींच्या काही ओळी ट्विट करत असतात. काल व आज त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या काही ओळी ट्विट केल्या आहेत. आज राऊतांनी फक्त 'अग्नीपथ अग्नीपथ अग्नीपथ' इतकेच सूचक ट्विट करून इशारा दिला आहे. या ट्विटवरून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

शिवसेना-काँग्रेस नाते जुनेच; पक्षस्थापनेपासून अनेकवेळा... 

कालही अँजिओग्राफी झालेल्या राऊतांनी तब्येत बरी नसतानाही ट्विट केले होते. "लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती।' - बच्चन. हम होंगे कामयाब.. जरूर होंगे...' असे ट्विट केले होते. शिवसेनेला बहुमत सिद्ध करता आले नसले तरी आम्ही हार मानणार नाही, असाच संदेश तर राऊतांना या ट्विटमधून द्यायचा होता. तसेच काल लीलावतीमधून काल त्यांच्या बेडवरून त्यांनी संपादकीय लिहिले. हा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.  

'कोशीश करने वालों की कभी हार नहीं होती'; राऊतांचे थेट लीलावतीतून ट्विट

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut Tweet on 13 November