Dombivali News : शिवसेना आणि मनसेत मनोमिलन झाले का? खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार राजू पाटील एकाच व्यासपिठावर....

कल्याण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना टक्कर देणारा उमेदवार म्हणून एकीकडे मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
shivsena mp shrikant shinde and mns mla raju patil
shivsena mp shrikant shinde and mns mla raju patilsakal

डोंबिवली - कल्याण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना टक्कर देणारा उमेदवार म्हणून एकीकडे मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर दुसरीकडे विकासकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात खासदार आमदार एका व्यासपीठावर एकत्र आल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी अनेक कार्यक्रमात खासदार आमदार यांना एकत्रित निमंत्रण देण्यात आली होती. मात्र यांनी एकत्र येणं टाळलं होत.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोघे एकाच व्यासपीठावर आल्याने शिवसेना मनसेचे मनोमिलन झाले का ? यावर चर्चा रंगली आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचा सिलसिला सुरू असल्याने नक्की कल्याण लोकसभा मतदारसंघात शिजतय काय या चर्चेला उधाण आलंय.

कल्याण लोकसभा मतदारसंघ हा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलाच चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ तसेच दुसरी बाब म्हणजे येथे स्थानिक पातळीवर असलेला भाजप व शिवसेना शिंदे गटातील वाद यामुळे देखील हा मतदारसंघ चर्चिला जात आहे. ठाकरे गटाने देखील यामुळे या मतदारसंघात आपले लक्ष केंद्रित केले असताना काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मतदारसंघात दौरा करत चाचपणी केली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात मनसेकडून आमदार पाटील यांचे नाव चर्चेत आहे. मनसेचे आमदार राजू पाटील हे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना काटे की टक्कर देऊ शकतात असे बोलले जात आहे. यापूर्वी अनेकदा विकास कामांवरून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. मनसेकडून नुकतीच या मतदारसंघात चाचपणी करण्यात आली आहे.

एककिडे असे वातावरण असताना दुसरीकडे मात्र विकास कामाच्या भूमिपूजनसाठी आता एकत्र येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी दिवा येथील विकासकामाची पाहणी करताना पालिका आयुक्त बांगर यांच्यासोबत मनसे आमदार राजू पाटील आणि शिंदे गटाचे पदाधिकारी एकत्र आल्याचे दिसुन आले होते. तर सोमवारी सकाळी दिवा रेल्वे स्टेशनवरील विकासकामांच्या भूमिपूजनवेळी खासदार शिंदे आणि मनसे आमदार पाटील एकाच व्यासपिठावर दिसून आले.

यावेळी खासदार शिंदे म्हणाले, दिवा रेल्वे स्थानकाहून दिवा सीएसटी लोकल चालू करण्यासाठी माझ्यासह, आमदार राजू पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधी देखील प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे होम प्लॅटफॉर्म, लांब पल्ल्याच्या गाड्याना थांबा देण्याची प्रवाशांची मागणी आहे. याबाबत देखील पाठपुरावा सुरू असल्याची माहिती खासदार शिंदे यांनी दिली.

दिवा रेल्वे स्टेशनच्या विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी खासदार शिंदे, आमदार राजू पाटील दिव्यात एकत्र आल्याचे दिसून आले आहॆ. त्यामुळे राजकीय कट्टर विरोधक असलेले दोघांमध्ये आतां यांच्यात मनोमिलन झाल्याची चर्चा सुरु झाली आहॆ. दुसरीकडे गेल्या काही महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे एकमेकांना अनेक वेळेला भेटताना आपण पाहिले आहॆ. यामुळे येत्या काळात शिंदेची शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होते का हे पहावे लागेल...

मनसे आमदार पाटील यांच्या मुलाच्या सारखंपुढ्यात मुख्यमंत्री यांची उपस्थिती...

मनसे आमदार राजू पाटील यांच्या मुलाचा साखरपुढा नुकताच पार पडला.या सारखंपुढ्यात स्वतः मुख्यमंत्री आणि खा शिंदे यांनी उपस्थित लावत, आमदार पाटील यांच्या मुलांला शुभेच्छा दिल्या...

डिसेंबर महिन्यात ठाकरे आणि शिंदेची भेट...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 29 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.ठाकरे आणि शिंदे यांची डिसेंबर महिन्यातील ही दुसरी भेट होती. यापूर्वी 2 डिसेंबरला हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे आणि ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढवण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com