"गाय म्हणजे माता आणि पलिकडे जाऊन खाता" हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी घेतली शाळा

संजय मिस्कीन
Sunday, 25 October 2020

मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवत त्यांनी आज दसरा मेळाव्यातून विरोधकांवर सडकून टीका केलीये

मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून भाषण केलं. मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवत त्यांनी आज दसरा मेळाव्यातून विरोधकांवर सडकून टीका केलीये. उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला.  

आमच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह

मंदिर  उघडली नाहीत म्हणून आमच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. याचा दाखला देत ठाकरे म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांचं हिंदुत्व आणि तुमच हिंदुत्व यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. बाबरी पाडली तेव्हा कोण बिळात लपून बसले होते ? आमचं हिंदुत्व हे बुरसटलेले नाही. मला मंदिरात घंटा बडवणारा हिंदू नको तर अतिरेक्याना बडवणारा हिंदू पाहिजे. अशा शब्दात त्यांनी हल्ला चढवला.

महत्त्वाची बातमी "भाजपचा नेता व त्यांची दोन मुले तोंडात शेण घेवून ठाकरे घराण्यावर गोमुत्राच्या गुळण्या टाकत होते"

गाय मरो आणि  माय जगो असे आमचे हिंदुत्व नाही

गाय मरो आणि  माय जगो असे आमचे हिंदुत्व नाही. गाय म्हणजे माता आणि पलिकडे जाऊन खाता. असा टोला लगावत गोवंश कायदा हा गोव्यात का नाही ? असा सवाल भाजपला केला. हा दसरा मला भव्य  करता आला असता  पण मला माझ्या जनतेची काळजी आहे आणि आम्ही कायदा पाळतो. असा टोलाही त्यांनी बिहार निवडणूकीत पंतप्रधान करत असलेल्या जाहिर सभा संदर्भात केला. 

महत्त्वाची बातमी  : दसरा मेळाव्यात मुखमंत्री उद्धव ठाकरे स्टेजवर असतानाच संजय राऊतांनी काढला फडणवीसांचा विषय

38 हजार कोटी केंद्राकडे बाकी

महाराष्ट्राच्या जीएसटीचे 38 हजार कोटी केंद्राकडे बाकी आहेत.  हा पैसा आमच्या हक्काचा आहे आणि केंद्र राज्याला देत नाही. मी इतर राज्यांना एकत्र येण्याचे आवाहन करतो. असेही ते म्हणाले.  जीएसटी जर फसली असेल तर पुन्हा जुनी प्रणाली अमलात आणा. असे आवाहन त्यानी केले. 

नितीशकुमार हिंदुत्ववादी झाले की भाजप सेक्युलर झाली ?

संघमुक्त भारत अशी हाक देणारे नितीश कुमार यांच्यासोबत युती करताना नितीशकुमार हिंदुत्ववादी झाले की भाजप सेक्युलर झाली ? असा बोचरा सवाल ठाकरे यांनी केला. भेदभाव करून सरकार चालवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. एकाला विकत आणि एकाला फुकट. अशा शब्दात ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. 

( संपादन - सुमित बागुल )

shivsena party chief uddhav thackeray on hinduttwa GST and nitish kumar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena party chief uddhav thackeray on hinduttwa GST and nitish kumar