esakal | "भाजपचा नेता व त्यांची दोन मुले तोंडात शेण घेवून ठाकरे घराण्यावर गोमुत्राच्या गुळण्या टाकत होते"
sakal

बोलून बातमी शोधा

"भाजपचा नेता व त्यांची दोन मुले तोंडात शेण घेवून ठाकरे घराण्यावर गोमुत्राच्या गुळण्या टाकत होते"

आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना उध्दव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष व त्यांच्या नेत्यावर चौफेर टीका केली

"भाजपचा नेता व त्यांची दोन मुले तोंडात शेण घेवून ठाकरे घराण्यावर गोमुत्राच्या गुळण्या टाकत होते"

sakal_logo
By
संजय मिस्कीन

मुंबई , ता. 25: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पक्षावर कडाडून हल्ला चढवत हिम्मत असेल तर महाविकास आघाडीचे सरकार पाडून दाखवाच असे आव्हान करत जर हिम्मत कराल तर छाताडावर बसून गुढीपाडवा साजरा करू. असा सणसणीत इशारा दिला. 

महत्त्वाची बातमी :  उद्धव ठाकरेंकडून भाजपचा खरपूस समाचार, दसरा मेळावा भाषणातील सर्व मुद्दे वाचा

आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना उध्दव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष व त्यांच्या नेत्यावर चौफेर टीका केली. अत्यंत आक्रमक शैलीत ठाकरे यांनी भाजपचे वाभाडे काढले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक जण हे सरकार पाडण्याच्या मागे आहेत मी इथून आव्हान देतो की, हिम्मत असेल तर हे सरकार पाडून दाखवा. आम्ही गुळाला चिकटणारे मुंगळे नाही, मुंगळा कसा डसतो ते आम्ही दाखवू. असा इशाराही दिला. जो आमच्या आडवा येईल त्याला आडवा करून छाताडावर पाय ठेवून गुढी उभी करून पुढे जाऊ. असे ते म्हणाले.  

महत्त्वाची बातमी : दसरा मेळाव्यात मुखमंत्री उद्धव ठाकरे स्टेजवर असतानाच संजय राऊतांनी काढला फडणवीसांचा विषय

विचारांचं सोनं घेऊनच आम्ही पुढे चाललो आहोत. पण सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात एक भाजपचा नेता व त्यांची दोन मुले तोंडात शेण घेवून ठाकरे घराण्यावर गोमुत्राच्या गुळण्या टाकत होते. असा संताप व्यक्त करत आजपर्यंत  बेडकाच्या पिल्लाने गोष्टीत बैल पाहिला होता. पण आता बेडकाच्या पिल्लाने वाघ पाहिला. अशी टोकाची टीका ठाकरे यानी केली. आम्ही वाघाची अवलाद आहोत डीवचाल तर पस्तावाल. असा इशाराही त्यांनी दिला.

( संपादन - सुमित बागुल )

shivsena dussehra melawa udhav thacketry speech, uddhav thackeray targets bjp leader and his sons who were constantly targeting thackerays