शिवसेना मराठीच्या बाजूने ठामपणे उभी राहील, शोभा देशपांडे यांच्या आंदोलनांनंतर राऊतांची प्रतिक्रिया

समीर सुर्वे
Friday, 9 October 2020

महाराष्ट्रात मराठीचा मान राखलाच पहिले. मराठीचा अपमान होत असेल तर सरकार सोडाचा शिवसेनेने मराठी माणसांच्या बाजूने ठाम उभीर राहील असं आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी लेखीका शोभा देशपांडे यांच्या आंदोलनाबद्दल बोलताना नमुद केले

मुंबई, ता. 9 : महाराष्ट्रात मराठीचा मान राखलाच पहिले. मराठीचा अपमान होत असेल तर सरकार सोडाचा शिवसेनेने मराठी माणसांच्या बाजूने ठाम उभीर राहील असं आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी लेखीका शोभा देशपांडे यांच्या आंदोलनाबद्दल बोलताना नमुद केले.

काल मराठीतून बोलण्यास नकार देणाऱ्या मुंबईतील ज्वेलर्सच्या दुकानासमोरच लेखिका शोभा देशपांडे यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. आज त्या ज्वेलर्स दुकानदाराने शोभा देशपांडे यांची मराठीतून माफी मागितली आहे. मराठीतून बोलण्यास नकार दिल्यानंतर शोभा यांनी काल संपूर्ण रात्र तब्बल २० तासांचं ठिय्या आंदोलन पुकारलं होतं. त्यांच्या आंदोलनानाला , त्यांच्या लढ्याला अखेर यश आलंय. आज सकाळी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसंच त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

महत्त्वाची बातमी : बिहार निवडणूक 2020: शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर लढता येण्याची शक्यता कमी

आणखीन काय म्हणालेत संजय राऊत : 

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांनी उघड केलेला टीआरपी घोटाळा, सीबीआयचे माजी संचालक अश्‍विन कुमार यांच्या आत्महत्येबाबत भुमिका मांडली. ते म्हणाले, अश्‍विन कुमार हे सीबीआयचे निवृत्त संचालक होते. त्याच बरोबर ते एका राज्याचे पोलिस महानिरीक्षक माजी राज्यपाल होते. त्यांच्या सारख्या खंबिर माणसाने आत्महत्या करावी. याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. असेही त्यांनी नमुद केले.

रिपब्लीकन वाहीनीवर मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याचा ठपका ठेवला आहे. त्यावर ही कारवाई सुडबुध्दीने केली असल्याचा आरोप केला जात आहे. ही कारवाई सुडबुध्दीने आहे तर महाराष्ट्राविरोधात जे चाललं होतं ती सदभावना होती का असा प्रश्‍नही राऊत यांनी उपस्थीत केला.

महत्त्वाची बातमी : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणः तिन्ही आरोपींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी स्वत: या घोटाळ्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ठोस पुरावे असतीलच. हा एक सगळ्यात मोठा गुन्हा आहे. आर्थिक उलाढाल केली जाते. महाराष्ट्रावर राजकीय नेत्यांवर गरळ ओकणारे सत्य आणि नितीमत्तेचे धडे शिकवणारे नितीमत्तेचे धडे शिकवणारे शामिल होते. आता मुंबई पोलिसांवर हल्ले केली जातील. पण, खोटेपणा महाराष्ट्राच्या भुमित टिकत नाही. असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवरही हल्ला चढवला. 

shivsena reaction on shobha deshpandes agitation for marathi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena reaction on shobha deshpandes agitation for marathi