आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश : ShivSena Row | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray

ShivSena Row: आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

मुंबई : शिवसेनेचं चिन्ह आणि नाव हातातून गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीबाहेरुन शिवसैनिकांना संबोधित केलं. या चोरांना निवडणुकीत गाडल्याशिवाय शांत बसायचं नाही, त्यामुळं आजपासूनच निवडणुकीच्या तयारीला लागा, असं आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदयाला केलं. (ShivSena Row Start preparing for elections from today Uddhav Thackeray order)

उद्धव ठाकरे म्हणाले, या पुढं चोरबाजारांच्या मालकाला आणि चोरांना निवडणुकीत गाडल्याशिवाय रहायचं नाही. हा योगायोग नाही. आज महाशिवरात्र आहे उद्या शिवजयंती आहे, जणू काही या दिवसांचा मुहूर्त बघून शिवसेना हे नाव चोरलं गेलंय, धनुष्यबाण चोरलं गेलेलं आहे. पण ज्यांनी हे चोरलंय त्यांना हे माहिती नाही की त्यांनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारला आहे. आजपर्यंत त्यांनी मधमाशांनी जमवलेला मधाचा आस्वाद घेतला आहे पण त्यांना अद्याप मधमाशांचा डंख लागलेला नाही. तो डंख आता करायची वेळ आलेली आहे.

ज्या पद्धतीनं आपलं शिवसेना हे नाव चोरांना दिलं गेलं. ज्या पद्धतीनं हे कपट कारस्थान करत आहेत त्यानुसार कदाचित हे आपलं मशाल चिन्ह देखील काढून घेतील. माझं आव्हान आहे की सर्वांच्या साक्षीनं की ज्यांनी धनुष्यबाण चोरलेले मर्द असतील तर त्यांनी धनुष्यबाण घेऊन मैदानात याव मी मशाल घेऊन मैदानात येतो, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं.

माझ्या हातात काहीही नाही, पण लढा आता सुरु झाली

आता आपली परीक्षा आहे लढाई तर आता सुरु झालेली आहे. माझ्या हातात आता काहीही नाही. मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. हे तरुण रक्त जे पेटलेलं आहे. शिवसैनिकांचा संयम त्यांनी पाहिला आहे शिवसैनिकांचा राग पाहू नका, असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला. काल एकनाथ शिंदेंच्या हातात धनुष्यबाणाचो फोटो होता तेव्हा त्यांचा चेहरा तेव्हा मी चोर असल्याची त्यांचा चेहरा होता. त्यामुळं आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागा.