मी शिवसैनिक आहे...अॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही; संजय राऊत संतापले

मी शिवसैनिक आहे...अॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही; संजय राऊत संतापले

मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे. हा मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. तसंच अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी राऊत यांनी राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे. कंगनानं मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. 

मी कोणाचंही नाव घेणार नाही.  मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अ‍ॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही, या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत, त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, या शब्दात संजय राऊत यांनी कंगनावर निशाणा साधला आहे.

राम कदमांनी कंगनाची तुलना झाशीच्या राणीशी करणं हा सर्वात मोठा अपमान आहे. झाशीची राणी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहे.  झाशीची राणी ही महाराष्ट्राची वीरकन्या, महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्सच्या गुळण्या करून आणि नशेच्या अंमलात कोणी स्वत:ला झाशीची राणी समजत असेल, आणि राजकीय पक्ष झाशीच्या राणीचा अपमान करणार असेल, तर राजकारण किती तळाला नेलंय हे स्पष्ट दिसतंय, असंही ते म्हणालेत.

धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही, आम्ही अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलिस त्यांचं रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?, असा सवालही संजय राऊत उपस्थित केला आहे. 

मुंबई पोलिसांनी त्याबाबत कठोर पावलं उचलावीत. अशा पागल लोकांना जे पक्ष पाठिंबा देत आहेत. त्या पक्षांना पाकव्याप्त काश्मीरने मतदान केलं आहे का? तुम्हाला पाकिस्तानी लोकांनी मतदान केलं आहे का? मुंबई पोलिस हे पाकिस्तानचे पोलिस आहेत का? ज्या मुंबई पोलिसांनी अतिरेकी हल्ले परतवून लावून मुंबईचं संरक्षण केलं ते लोक काहीही बरळणार आहेत का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

Shivsena sanjay raut attack on kanagan ranaut statement

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com