
ठाणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर शिवसेना शिंदे गटामध्ये माजी नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाचा धडाका सुरुच आहे. रविवारी मुंबई सायन- कोळीवाडा प्रभाग क्रमांक १७३ चे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक रामदास कदम यांनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाकडे मुंबईत आता १२४ माजी नगरसेवकांची कुमक तयार झाली आहे. त्यामुळे वन टू का फोर करत मुंबईत महायुतीची सत्ता येणारच असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.