

Abhijit Tharwal joined BJP
ESakal
डोंबिवली : शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांचे निकटवर्ती विकास देसले यांनी सकाळी भाजपात प्रवेश केला. शिंदे गट या धक्क्यातून सावरत नाही तोच सायंकाळी शिंदे गटाला भाजपने दुसरा धक्का दिला. शिंदे गटाचे ज्येष्ठ पदाधिकारी सदानंद थरवळ यांचे सुपुत्र अभिजित थरवळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.