esakal | ...हे बेईमानीचेच लक्षण, शिवसेनेनं डागलं योगी सरकारवर टीकास्त्र
sakal

बोलून बातमी शोधा

...हे बेईमानीचेच लक्षण, शिवसेनेनं डागलं योगी सरकारवर टीकास्त्र

या अग्रलेखात शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजप सरकारवर टीका केली आहे. मजुरांच्या स्थलातरांच्या प्रश्नावरून सेनेनं योगी आदित्यनाथ सरकारवर टीकेचा आसूड ओढला आहे.

...हे बेईमानीचेच लक्षण, शिवसेनेनं डागलं योगी सरकारवर टीकास्त्र

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - शिवसेनेनं योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर सडकून टीका केली आहे. आपल्याच मजुरांना राज्यात न घेण्याच्या निर्णयावरुन शिवसेना चांगली भडकली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. त्यानंतर वेगवेगळ्या राज्यात लाखो मजूर अडकले. दरम्यान अडकलेल्या लोकांसाठी प्रवासांची मुभा देण्यात आली. मात्र त्यानंतर अडकलेल्या मजुरांना आपल्याच राज्यात न घेण्याचा निर्णय योगी सरकारनं घेतला. त्या निर्णयावर शिवसेनेनं टीकास्त्र सोडलं आहे. 

या अग्रलेखात शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजप सरकारवर टीका केली आहे. मजुरांच्या स्थलातरांच्या प्रश्नावरून सेनेनं योगी आदित्यनाथ सरकारवर टीकेचा आसूड ओढला आहे.

हे बेईमानीचे लक्षण
 
कालपर्यंत अनेक राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांसाठी 'व्होट बँक' असलेल्या मजूरवर्गाला आता कोणीच वाली उरलेला नाही. त्यांचे राजकीय मालक-पालक तोंडात मास्कचे बोळे कोंबून घरातच बसले आहेत. हिंदी भाषिकांसाठी त्यांच्या राज्याचे दरवाजे बंद केले गेले आहेत. हे बेईमानीचे लक्षण असून पालघरमधील साधू हत्याकांडाइतकाच निर्घृण आणि अमानुष प्रकार आहे, असा हल्ला शिवसेनेनं चढवला आहे.

मोठी बातमी - तुमच्या आमच्या EMI बद्दल सर्वात मोठी बातमी! RBI देणार मोठा दिलासा?
 

योगी सरकारचा यू- टर्न

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने स्थलांतरित मजुरांबाबत जो ‘यू टर्न’ घेतला आहे तो माणुसकीस धरून नाही. आपल्याच लोकांशी असे क्रूरपणे वागणे कोणालाच शोभत नाही. महाराष्ट्राने आतापर्यंत या सगळ्यांना पोसले-पाळले. आता संकटकाळी त्यांना आपल्या राज्यात परत जायचे आहे तर त्यांची मातृ-पितृ राज्ये त्यांना जवळ येऊ देत नाही. योगी किंवा नितीश कुमारांना आपल्याच लोकांच्या बाबतीत असं निर्घृणपणे वागता येणार नाही, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. 

राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या श्रीमंतांच्या मुलांना आणण्यासाठी योगी सरकारनं शेकडो बस पाठवल्या. त्यांना विनाचाचण्या आणण्यात आले. मग मजूरवर्गास का घेतले जात नाही, असा सवाल शिवसेनेनं उत्तर प्रदेश सरकारला विचारला आहे.

आता बोंबला! आजपासून मुंबईत फक्त 'ही' दुकानं राहणार सुरु

सोप्या मराठी भाषेत त्यास बगला वर करणे म्हणतात आणि उत्तर प्रदेश प्रशासनाने अशा बगला वर केल्यानं 30-35 लाख हिंदी मजूरवर्गाच्या जीवाची तडफड सुरू आहे. लाखो लोकांनी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी झुंबड उडवली आहे. पण या लाखो श्रमिकांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री स्वगृही घ्यायला तयार नाहीत. या सर्व श्रमिकांच्या कोरोना चाचण्या करा आणि नंतरच त्यांना पाठवा, अशी आडमुठी भूमिका घेऊन योगी सरकारने आपल्याच लेकरांना संकटकाळी लाथाडले आहे. इतर हिंदी भाषिक राज्यांनीही अशीच भूमिका घेतल्याने फक्त महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यात अडकलेल्या मजुरांवर नव्याने सुलतानी संकट कोसळले आहे, अशी थेट टीका शिवसेनेनं केली आहे.

shivsena targets yogi government over not accepting people returning from mumbai and maharashtra