आता बोंबला! आजपासून मुंबईत फक्त 'ही' दुकानं राहणार सुरु

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मे 2020

दारुची दुकानं उघडताच मुंबईतल्या विविध भागांत दारूच्या दुकानांबाहेर मद्यप्रेमींनी रांगा लावल्या. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा चांगलाच फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

मुंबई -  देशात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. सोमवारपासून लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. या तिसऱ्या टप्प्यात देशाची आर्थिक स्थिती देखील सांभाळण्यासाठी सरकारनं काहीशा प्रमाणात सूट देत दारूची दुकानं सुरु केली. मुंबईत आधीपासूनच कोरोनाचा प्रार्दुभाव सर्वाधिक आहे. तसंच मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई शहर हे रेड झोनमध्ये असतानाही दारुसाठी तळीरामांनी तुडूंब गर्दी केली. सोमवारी दारुची दुकानं उघडताच मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली. यासर्व प्रकारामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका आहे. याच पार्श्वभूमीवर आजपासून मुंबईत दारू विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश महापालिकेकडून देण्यात आला आहे. 

ते आलेत आणि त्यांनी आईच्या चेहऱ्यावर फुलवलं हसू, सर्वच स्तरातून होतंय मुंबई पोलिसांचं कौतुक 

दारुची दुकानं उघडताच मुंबईतल्या विविध भागांत दारूच्या दुकानांबाहेर मद्यप्रेमींनी रांगा लावल्या. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा चांगलाच फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सोशल मीडियावर याबाबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले. झालेल्या या सर्व प्रकारामुले इतर नागरिकांकडून आणि सोशल मीडियावर अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्याचमुळे महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. पालिकेनं यासंदर्भात एक पत्रक जारी केलं आहे. 

हृदयद्रावक ! कसाबला फाशीच्या दारात पोहोचवणारा 'तो' सध्या काय करतोय?  

पालिका आयुक्तांचा दणका

मुंबईत दारूच्या दुकानांबाहेर झालेली गर्दी पाहून पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हा कठोर निर्णय घेतला. जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची दुकाने सोडून मुंबईत इतर कोणतेही दुकान उघडण्यास मनाई असेल, असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. पालिका आयुक्तांनी रात्री उशिरा हा आदेश काढला. 

पालिकेनं पत्रात नमूद केलं आहे की, लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही नियम शिथिल करताच नागरिकांनी रत्यावर गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. अशात सोशल डिस्टंसिंग देखील पाळलं जात नसल्यामुळे मुंबईत आजपासून आधीसारखेच लॉकडाऊन पाळले जाईल. त्यामुळे आजपासून मुंबईत पूर्वीच्या आदेशाप्रमाणे केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि औषध दुकानेच उघडी राहतील. 

तुमचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आलाय, कपडे आणि इतर साहित्य बांधून ठेवा, ऍम्ब्युलन्स तुम्हाला न्यायला येतेय

कडक कारवाई करणार

दरम्यान आदेशाची संपूर्ण मुंबईत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यावर कलम 188 अन्वये कठोर कारवाई करण्यात यावी, असंही पालिकेनं पत्रकात नमूद केलं आलं आहे. 

एका भागात अनावश्यक वस्तुंची केवळ पाच दुकाने उघडण्यास परवानगी होती. त्या आदेशानुसार दारूची दुकाने उघडली होती. मात्र हा आदेश तातडीने रद्द करण्यात आला. दीड महिने दारु न मिळालेल्या तळीरामांनी सोमवारी सकाळपासून दुकांनाबाहेर रांगा लावल्या होत्या. 

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. त्यातच रुग्णांची संख्या कमी होण्याचं नावं घेत नाही आहे. अशी परिस्थिती असताना पुन्हा नागरिकांनी रस्त्यावर येऊन गर्दी करणं योग्य ठरणार नाही. त्यातच मुंबई शहर हे रेड झोनमध्ये आहे. त्यानुसार मुंबईत काही बंधनं देखील घालण्यात आलीत. सोमवारी सुरु झालेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही बंधनं शिथिल करण्यात आली होती. पण शहरात अनेक ठिकाणी नियमांची पायमल्ली झाल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर शहरात झालेल्या सर्व गोष्टी लक्षात घेत पूर्वीप्रमाणे मुंबईतील केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवता येतील, असे आदेश प्रवीणसिंह परदेशी यांनी मंगळवारी दिले.

only these stores will be open in mumbai from 6th may read full report


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only these stores will be open in mumbai from 6th may read full report