शिवसेना म्हणतेय, फडणवीस तुम्ही कामाला लागा..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' या वृत्तपत्रातून चांगलीच आगपाखड करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानांचा चांगलाच समाचार सामनामधून घेण्यात आलाय. "देवेंद्र फडणवीस तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा,"असं सामनामध्ये लिहिण्यात आलंय.

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' या वृत्तपत्रातून चांगलीच आगपाखड करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानांचा चांगलाच समाचार सामनामधून घेण्यात आलाय. "देवेंद्र फडणवीस तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा,"असं सामनामध्ये लिहिण्यात आलंय.

मोठी बातमी - वॉचमन म्हणाला चल चॉकलेट आणि १४ वर्षीय मुलीला केलं गर्भवती...

काय म्हंटलंय सामनामध्ये:
 
आमच्यात संवाद मस्त आहे:
 
"फडणवीसांनी राज्याचं मुख्यमंत्रिपद दोनदा भूषवलं आहे. एकदा ५ वर्ष आणि दुसऱ्यांदा ८० तास. मात्र त्या ८० तासांचा अनुभव महत्त्वाचा आहे. कारण त्या ८० तासांत राष्ट्रपती भवन, राजभवन, गृहमंत्रालय, ईडी, सीबीआय यांच्यामार्फत संवाद साधूनही महाविकासआघाडीचा एकही आमदार फुटला नाही. त्यामुळे तुमच्यापेक्षा आमच्यातील संवाद मस्त आहे, मात्र तुम्ही तुमच्या १०५ आमदारांशी संवाद साधायचं ठरवलं तर फडणविसांच काय होईल ? त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी विरोधीपक्ष नेता म्हणून कामाला लागावं."असा खोचक टोला सामनातून लगावला आहे.

तर विरोधी पक्षांना झाल्या असतील मानसिक गुदगुदल्या:

नागपुरात संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी देवेंद्र फडणवीस फार काळ विरोधी पक्षात राहणार नाही असं विधान केलं होतं. त्यावरही सामनामधून टीका करण्यात आली आहे.
"नागपुरात संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी एक हवाबाज विधान केलंय. देवेंद्र फडणवीस फार काळ विरोधी पक्षात राहणार नाही. त्यांच्या मागची माजी ही बिरुदावली लवकरच जाईल. या विधानामुळे विरोधी पक्षांना मानसिक गुदगुदल्या झाल्या असतीलही, पण महाराष्ट्रात असं काहीही  घडणार नाहीये." अशीही टीका सामनामधून करण्यात आली आहे.

मोठी बातमी - 'त्यांनी' रातोरात बदलले..! अन् मुले परिक्षेला गेली

चहापानावर बहिष्काराचं आश्चर्य नाही:

"मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार टाकला. त्यात आश्चर्य वाटण्यासारखे आता राहिलेलं नाही. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चहापानावर बहिष्कार टाकून विधीमंडळ अधिवेशनातील त्यांच्या पक्षाची दिशा ठरवून टाकली आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु झालं. विरोधी पक्षानं चहापान कार्यक्रमात हजेरी लावून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधायला हवा होता." असंही सामनात म्हंटलंय. 

shivsena taunts fadanavis from samana says fadanavis must start working as opposition leader


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena taunts fadanavis from samana says fadanavis must start working as opposition leader