

Thackeray Group Support BJP in Badlapur
ESakal
बदलापूर : राज्यात, केंद्रात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि भाजपामध्ये तीव्र वैचारिक संघर्ष सुरू आहे. बदलापूरमध्ये मात्र याच्या उलट चित्र समोर आले आहे. उद्धव ठाकरे गटाच्या सात उमेदवारांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार असूनही थेट भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांना पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे स्थानिक निवडणुकीतील समीकरणे बदलली असून उबाठा-भाजप या अनपेक्षित युतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.