
डोंबिवली : कल्याणमध्ये मुलीला मारहाण झाली याप्रकरणी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. या घटनेमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित होत असून गृहमंत्री काय करत आहेत? असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला. महाराष्ट्रातील महिलांच्या रक्षणासाठी कोण भाऊ आहे का ? गृहमंत्री याची जबाबदारी घेणार आहेत का? रक्षाबंधन लवकरच येत असून सीमेवरील जवानांऐवजी गृहमंत्र्यांना आपण राख्या पाठवूया. असा खोचक टोला यावेळी ठाकरे गटाने भाजपला लगावला आहे.