Maharashtra Politics: कुठे जुगाराचा डाव, कुठे बॉक्सर! शिवसेना ठाकरे गटाचा डोंबिवलीत जनआक्रोश
Shivsena Thackeray Group Protest: शिवसेना ठाकरे गटाने महाराष्ट्रात महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन करत मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
डोंबिवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महाराष्ट्रात महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन सोमवारी केले. डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी निदर्शन करत मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.