

Thackeray Brothers Attack BJP Over Alliance Politics At Shivaji Park Rally
Esakal
राज्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मुंबईत शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची संयुक्त सभा झाली. या सभेत ठाकरे बंधूंची तोफ कडाडली. दोघांनीही भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. राज ठाकरे यांनी २०१४ नंतर मुंबई, महाराष्ट्रासह देशात अदानींच्या हातात जमिनी आणि उद्योग कसे आणि किती प्रमाणात गेले याचा व्हिडीओच दाखवला.